पाळा सालबर्डी येथे आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन ! 

0
875
Google search engine
Google search engine
पाळा सालबर्डी येथे आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन !
१५ लक्ष रुपयांच्या विकासकामाला सुरुवात !
मोर्शी तालुका प्रतिनिधी :
ग्रामीण भागात विविध पायाभूत सुविधांच्या उभारणीतून विकासाला गती देण्यासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी आज पाळा येथील विविध विकासकामांच्या भूमिपूजन सोहळ्या प्रसंगी व्यक्त केले.
आमदार देवेंद्र भुयार यांनी जिल्हा क्रीडा निधी अंतर्गत सालबर्डी येथे व्यायाम शाळा बांधकाम करणे करीता ७ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून पाळा येथे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत कुकडे ते आहाके यांचे घरापर्यंत रस्ता बांधकाम करणे ४ लक्ष रुपये, ग्राम स्वराज अभियान अंतर्गत सी एस सी खोलीचे बांधकाम करणे ४ लक्ष रुपये विकासकामांचे भूमिपूजन आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामीण भागात विविध सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी अनेक कामांना गती देण्यात आली आहे. प्रशासकीय यंत्रणेने ही कामे गतीने पूर्ण करावी, असे निर्देश आमदार देवेंद्र भुयार यांनी दिले.
यावेळी सरपंच अजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष नरेंद्र जिचकार, पोलीस पाटील सागर साठे, ग्राप सदस्य राजू उबाळे, संपतराव येवाले, मोरेश्वर गुडधे, नामदेव येवले, विलास राऊत, प्रकाश घोरमाडे, बाबाराव गायकवाड, अशोक गोडगाम, मदन वरठी, माणिकराव मरस्कोल्हे, शहादत खा पठाण, बंडू वागद्रे, राजू दळवी, ओंकारराव साठे, महादेव साठे, अशोक साठे, शंकरराव यूवनाते, प्रशांत राऊत, प्रकाश घोरपडे गोविंदराव हजारे घुषिराम धुर्वे, प्रफुल बैस, महादेव सातपाने यांच्यासह आदी मंडळी उपस्थित होती.