नगर परिषदने गाठला श्रीगणेश विटंबनाचा ‘अ’ दर्जा?

0
862
Google search engine
Google search engine

 

विसर्जनासाठी ‘अस्वच्छ टाक्या’ दिल्याने भक्तांची नाराजी

शेगांव :- महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या श्रीगणेश यांच्या आगमाची ओढ अवघ्या जगाला असते त्या साठी अनेक श्रीगणेश भक्त तयारीला लागतात, दहा दिवस बाप्पा आपल्या घरी येणार आहेत त्यासाठी मोठी जय्यत तयारी करतात, दहा दिवस मनोभावे पूजा-अर्चा करीत आपले भावना व्यक्त करतात आणि बाप्पाला निरोप देण्याच्या वेळी ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ असा नारा देतात आणि आनंदाने बाप्पाला निरोप भक्तांकडून दिला जातो परंतु आज आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे विसर्जन सोहळ्यावर शेगांव नगर पालिकेने भक्तांच्या उत्साहात विरजण टाकण्याचे काम केले? असे म्हणणे वावगे ठरणार नाही. कारण, नगर परिषदने नवीन उपाय योजना राबवत गावातील गणेश मूर्ती विसर्जनासाठी ठिकठिकाणी सुविधा केली, पर्यावरणाला अनुकूल असे गणेश विसर्जन व्हावे, एकच ठिकाणी गर्दी होऊ नये, गावातील विहिरी, तलाव स्वच्छ राहावे ह्या हेतूने गाजावाजा करीत न. प. ही योजना राबवीत असावे. पण योजना कष्या प्रकारे राबवली जाईल याचे नियोजन करण्यात मात्र न. प. ला अपयश आल्याचे लक्ष्यात येते.

नियोजन शून्य काम करीत विसर्जनाकरिता आलेली गाडी त्यात गाडीला सूचनांचे बॅनर व आत दोन अस्वच्छ टाक्या ठेवून गावच्या चौक चौकात ठेवल्या गेल्या आहेत. बाप्पाला निरोप देताना स्वच्छ ठिकाणी बाप्पाला आरती, फुल हार अर्पण केल्या जातो किंतु गाडीला गाडीला आकर्षक सजावट करून, स्वच्छ टाकी वापरून, त्या फुलांची सजावट करून देखील ही योजना राबवता आली असती तथापि श्रीगणेश भक्तांना त्या अस्वच्छ टाक्यांमध्ये गणेश मुर्ती विसर्जन करून श्री गजानन महाराजांच्या भूमीतील न. प. पापाचा वाटा उचलत आहे अशी चर्चासुद्धा विसर्जनासाठी आलेले भक्तगण करीत आहेत. अशी, अपूर्ण आणि गणेशभक्तांवर अन्याय कारक योजना राबवून नगरपालिका गणेश मूर्तीची विटंबना करण्यात ‘अ’ दर्जा घाठला आहे?

न.प. ने विसर्जनाकरिता टाकी कशा प्रकारची आहे? त्यामध्ये कुठले रसायन टाकण्यात आले? जेणे करून मूर्ती लवकर विरघळणार? त्याची विल्लेवाट कशा प्रकारे लावणार? आणि असे केलेले विसर्जन किती फायद्याचे? अशी कुठ्यालाच प्रकारची माहिती न देता बाप्पाच्या भक्ताची चक्क फसवणूक केली का? असा प्रश्नच आता समोर आला आहे. शासनाकडून ही योजना राबवण्यासाठी किती निधी मिळाला आणि त्याचा उपयोग न. प.तील अधिकारी वर्ग सत्ताधारी कसा घेत आहे ते आता उघड झाले असे डोळ्यात अंजन घालणारी चर्चा गावं वट्यावर होत आहे.
पोलिस प्रशासन प्रत्येक वेळी शांतता कमिटीची बैठक घेते, गावातील गणेश मंडळातील सदस्यांना बोलावुन तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार, नगर पालिका अधिकारी वर्गासोबत नगरसेवकांची, एम.एस.ई.बी.अधिकारीची सुद्धा हजेरी असते. पोलिस प्रशासन कडून सूचना दिल्या जातात, सूचना घेतल्या जातात परंतु फक्त गणपती मंडळ सदस्यांना सूचना माहिती दिल्यापेक्षा कधीतरी नगर परिषद अधिकारी यांना सुद्धा सूचना द्याव्यात आणि न. प. ने आपले सखोल नियोजन कधीतरी मांडावे अशी अपेक्षा गणेश मंडळातील सदस्य करीत आहेत. आज जशी विसर्जन टाक्याची परिस्तिथी आहे त्यामुळे श्रीगणेशाची विटंबना होत आहे त्यावर पोलीस प्रशासन झोपले आहे की काय अशा प्रश्न जनता विचारात आहे. नवनियुक्त पोलीस ठाणेदार आता काय कारवाई करतात? न. प. तील कोणत्या अधिकारीवर गुन्हा दाखल होतो? कोणता नगरसेवक व सभापती याला कारणीभूत आहे? की पोलीस अधिकारी सुद्धा मुंग गिळून गप्प राहतात? हे पाहणे महत्वाचे…