* केसरी कुस्ती स्पर्धेसाठी सांगली जिल्ह्यात निवड चाचणी घ्या:कुस्ती कोच पै.संदीप रास्कर यांची मागणी.सांगली जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष नामदेवराव मोहिते यांच्या मनमानी कारभार विरोधात आंदोलन करण्याचा इशारा*

Google search engine
Google search engine

* केसरी कुस्ती स्पर्धेसाठी सांगली जिल्ह्यात निवड चाचणी घ्या:कुस्ती कोच पै.संदीप रास्कर यांची मागणी.सांगली जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष नामदेवराव मोहिते यांच्या मनमानी कारभार विरोधात आंदोलन करण्याचा इशारा*

* सांगली /कडेगाव
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने ६४ वी वरिष्ठ गट गादी व माती राज्यस्तरीय अजिंक्य कुस्ती स्पर्धा (अधिवेशन) व महाराष्ट्र केसरी किताब 2020 – 21 स्पर्धा 8 नोव्हेंबर पासून पुणे येथे होणार आहेत. यासाठी राज्यभरातून मल्लांची स्पर्धा घेवून नवीन निवड चाचणी जाहीर करण्याबाबत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने जिल्हा व शहर तालीम संघांना कळवले आहे. असे असताना मात्र सांगली जिल्ह्यातून मागील वर्षी झालेल्या मल्लांची निवड चाचणी तशीच जाहीर करण्यात आली आहे. यामुळे गेल्या वर्षभरापासून सराव करणाऱ्या गोरगरीब घरातील मुलांनी परिस्थिती नसताना पोटाला चिमटा घेवून स्पर्धेची तयारी केली त्या पैलवानांच्या भविष्याच काय असा प्रश्न आतंरराष्ट्रीय कुस्ती संकुल कोच पै. संदीप रास्कर यांनी कडेगाव येथे झालेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
याबाबत जाब विचारण्यास गेले असता बंदी घालू अशी दमदाटी करून पैलवानांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सांगली जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष नामदेवराव मोहिते करत आहेत. नामदेवराव मोहिते यांच्यामुळे सांगली जिल्ह्याची कुस्ती 25 वर्षे पाठीमागे गेली आहे. त्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. असा आरोप पै.संदीप रास्कर यांनी केला आहे.
ते म्हणाले, (एनआयएस) कोच सूर्यवंशी सर तसेच राम नलवडे सर यांनी सांगलीची पैलवानकी जिवंत ठेवली होती. अशा महान व्यक्तींना सुद्धा त्यांनी दाबण्याचा प्रयत्न केला आहे.
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने जिल्हा व शहर तालीम संघांना पत्र देवून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी पैलवानांची पुन्हा निवड चाचणी करण्यास सांगितले आहे. मात्र त्यांचा आदेश डावलून नामदेवराव मोहिते यांनी पैलवानांची नवीन निवड चाचणी न घेता जूनाच संघ पुन्हा जाहीर केल्याने महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचा अपमान झाला आहे.
सांगली जिल्ह्याची निवड चाचणी पुन्हा घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. जर पुन्हा निवड चाचणी झाली नाही. तर जिल्ह्यातील सर्व मल्ल, पालक तसेच पैलवान यांना घेवूनन तीव्र आंदोलन करू असा इशारा पै संदीप रास्कर यांनी दिला आहे. यावेळी उपमहराष्ट्र केसरी मोहन माळी उपस्थित होते.