अप्रतिम साखरले शिवप्रेमींनी किल्याची प्रतिकृती…

0
473

शिवप्रेमींनी साकारली रायगडाची प्रतिकृती!

दीपावली निमित्त छत्रपती संभाजी चौक येथे बनविला किल्ला.

शेगांव:—- स्थानिक महापराक्रमी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चौक येथे दीपावली उत्सवानिमित्त संत नगरीतील शिवप्रेमींनी साकारली रायगड किल्ल्याची प्रतिकृती. एकविसाव्या शतकाकडे जशी-जशी आपण वाटचाल करीत आहोत . तशी तशी आपली परंपरा व संस्कृती लोप पावत आहे. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. वास्तविक पाहता आधी प्रत्येक घरांमध्ये दीपावलीनिमित्त छोटे घरकुल किल्ले लहान मुले बनवत होते त्यात दिवाळीला दिवे लावून आनंद उत्सव साजरा होत होता कारण तो उत्साहात तो आनंद पाहायला मिळत नाही. डिजिटल युगामध्ये नवतरुण सोशल माध्यमांमध्ये इतका गुंतलेले आहे की त्याला आपल्या इतिहासाचा, संस्कृतीचा, परंपरेचा विसर पडत चालला आहे. परंतु आजही काही असा तरुण वर्ग आहे की याची काही याची आठव आपल्या शैलीतून जनसामान्य पर्यंत पोहवण्याचे काम शिवप्रेमी तरुण एकत्र येतात व दगड मातीचा एक रेखीव किल्ला तयार करतात हे कौतुकास्पद आहे .पहिले छत्रपती, शिवाजी महाराज झाले त्यांच्या राज्याभिषेक ज्या किल्ल्यावर झाला तो रायगड चा किल्ला त्या रायगड किल्याची प्रतिकृती या शिवप्रेमी नी धर्मवीर संभाजी महाराज चौक येथे साकारली त्यामुळे आजच्या पिढीला गड किल्ल्याचे महत्त्व समजायला लागलं हे विशेष अनेक लहान मुलं त्या ठिकाणी येऊन फोटो काढून किल्ल्याची माहिती घेताना दिसले त्यामुळे या नवीन पिढीला शेगाव तील “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती” या शिवप्रेमींनी दीप उत्सवानिमित्त सुंदर रायगडाची प्रतिकृती तयार करीत गड-किल्ल्यांचे महत्व व दर्शन घडवण्यात हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. या किल्ल्यावर त्यांनी साकारला महादरवाजा, राजेश्र्वराचे मंदिर, टकमक टोक ,शिरकाई चे देऊळ, खुबलढा बुरूज,नाना दरवाजा,बाजारपेठ,गंगासागर तलाव,राजभवन,नगारखाना, हिरकानी टोक असे अनेक महत्वाचे स्थान या शिवप्रेमींनी त्या ठिकाणी साकारले हे.

शिवप्रेमींना विचारले असता त्यांनी सांगितले की आज ही किल्याची प्रतिकृती साकारताना खूप समाधान वाटले व त्याला गवतील जनतेनी प्रतिसाद सुद्धा दिला आम्ही पाहिले असता लहान मुलांना आई वडील फक्त फोटच नव्हे तर त्यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत होती रायगडची माहिती सुद्धा देत होती आजा च्या काळात ही बाब खूप महत्वाची आहे अशे उपक्रम अनेक ठिकाणी राबविले असता याची माहिती मिळेल.