न.प निवडणूक पारदर्शक व्हावी यासाठी मुख्याधिकारी शेळके यांची बदली करा…

0
371

न.प निवडणूक पारदर्शक व्हावी यासाठी मुख्याधिकारी शेळके यांची बदली करा…
किरणबाप्पू देशमुख
शेगाव- शहरातील निवडणूक पारदर्शक व्हवी यासाठी मुख्याधिकारी डॉ शेळके यांची बदली करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरणबाप्पू देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केली मुख्याधिकारी हे सत्ताधारी पक्षाला सहकार्य करण्याचे दृष्टीने निर्णय ते घेत असतात त्यामुळे न.प निवडणूक पारदर्शक होणार नाही अशी शंका त्यांनी उपस्थित केली मागे एकदा मुख्याधिकारी यांनी स्वतःचे लेटर पॅडवर राजकीय पक्षाचे गटनेता यांचे नावाचा उल्लेख करून संजय तिबडेवाल याचे विरुद्ध पोलिसात तक्रार करून दबाव आणण्याचा प्रयन्त केला हा प्रकार चुकीचा आहे शेगाव नप मधील नेता हा अहंकारी भूमिकेतून वागत आपला धाक निर्माण करण्याचा प्रयत्न शेगाव नप मध्ये कंत्राट देताना काही ठराविक लोकांनाच देण्यात येतात तेही “ब्लॅक लिस्ट” मध्ये असलेली ठेकेदार म्हणाजे त्या कामाचा दर्जा कशा असेल हे सांगण्याची गरज नसावी. यातून मोठया प्रमाणात भ्रष्ट्राचार करण्यात आला अनेक चुकीचे निर्णय घेऊन गावाला भकास करायचे काम केले आहे. उधललेल्या वारू प्रमाणे अहंकारी नेत्याचे वागणे हे गावाच्या हिताचे चुकीचे आहे येणाऱ्या काळात काहींनी नप निवडणुकीसाठी राजकीय हुंडी जमा केली आहे. या हुंदीचा वापर कशासाठी होईल स्वतः साठी,जनतेसाठी,की निवडणुकी साठी, की हुडी रिकामी सापडेल असे अनेक प्रश्न समोर आहेत.याचा वापर होणार शहरात नपच्या माध्यमातून चुकीचा पायंडा पडल्या जात आहे. नप च्या 33 गाळे धारक याना अजूनही न्याय देण्यात आला नाही शहरातील गाळे हे श्रीमंत लोकांना च कसे मिळतील असा डाव आखला असून हा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील नागरिकांवर अन्याय करनारी आहे नप फंडातून भूमीपूजनाच्या 33 जाहिराती देऊन जनतेच्या पैशाचा अपव्यय करण्यात आला आहे असा आरोप त्यांनी केला राजकीय जाहिराती देताना त्यांनी जमा केलेल्या राजकीय हुंडीचा वापर का करण्यात येत नाही. असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.
सोबतच त्यांनी न. प मुख्यधिकरी यांच्या विरोधात लेखी तक्रार सुद्धा निवडणूक आयोग आयुक्त मुख्याधिकारी याच्या न्यायालयात केला आहे. आता अधिकारी यावर कशी कार्यवाही करतो हे पाहणे प्रामुख्यानचे राहील कारण निवडणूक ही पारदर्शक व्हायला हवी.