बुलढाणा lcb ची धडक कार्यवाही

0
547
Google search engine
Google search engine

०४ दूचाकी चोर गजा आळ

शेगांव:- शेगांव नागरी मध्ये मागील ०२ दिवसा पासून बुलढाणा lcb पथकाची धडक कारवाई करीत दुचाकी चोरांची टोळी पकडणे सुरू केले त्याचे मुख्य सूत्र शेगांव मध्ये सापडले त्यात काही ४ते ५ व्यक्तींना पकडुन त्याची कसून चौकशी सुरू आहे.
काल रात्रीला विश्राम गृह मध्ये 12 गाडी जप्त केली आजा सकाळ पर्यंत गाडीची सख्या ही वाढत आहे आणखीन काही दुचाकीचा शोध मोठ्या जोमात सुरू आहे तसेच ही टोळी खूप मोठी असावी. काल जे काही टोळी पकडल्या गेली ते गेस्ट हाऊसमध्ये मध्ये काम करीत होते अशी प्राथमिक माहिती आहे.
काल रोजी पकडण्यात आलेल्या ०४आरोपींना सह 17 मोटरसायकल ताब्यात घेण्यात आल्या त्यामध्ये 14 मोटर सायकल एक मोटर सायकलचे चेचीस आणि गुन्हा व करण्यासाठी वापरण्यात आलेल्या दोन मोटर सायकल त्यासोबतच त्या मोबाईल फोन व शंभर रुपये एकूण ०८ लाख ५० हजार १०० रुपये एवढ्या वस्तू जप्त केल्या गेल्या. या गुन्ह्यामध्ये शेगावातील ०४ आरोपी शेख शाहरुख शेख फिरोज शेख, मोबीन शेख हारून, अमान खान असलम खान, मुन्शिफ खान अल्ताफ खान, यांच्यावर शेगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल करण्यात आले.
सदर कामगिरी अरविंद चावरीया पोलीस अधीक्षक, बुलढाणा बजरंग बनसोडे श्री अमोल कोळी, श्री.बळीराम गीते यांच्या मार्गदर्शनात विलास कुमार सानप, निलेश शेळके, श्रीकांत जिंदमवार, पोलीस अमंलदार सुधाकर काळे, पुरुषोत्तम आढाव अजित परसुवाले, दीपक मनसुबराव, रवी भिसे, राजू आढवे यांनी चांगल्या प्रकारची कामगिरी बजावत या टोळीला जेरबंद केले यासाठी प्रभारी पोलीस अधीक्षक श्री श्रावण दत्त यांनी त्याचे कौतुक केले.

त्यासोबतच मोटरसायकली पोलीस स्टेशन मध्ये पकडण्यात आलेल्या गावकऱ्यांना ही माहिती मिळताच आपली गाडी पाहण्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये येऊन गाडीची शहानिशा होत ओळख पटल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारचा आनंद दिसून आला व त्यांनी बुलढाणा पथकाचे आभार मानले.

त्यासोबतच एक सूचना देत शेगाव परिसरातील मागील दोन वर्षांमध्ये चोरी गेलेले आहेत त्यांनी शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री अनिल गोपाळ पोलीस निरीक्षक यांच्याशी संपर्क साधावा.