ब्रेकिंग न्यूज :- ३८ दोषींना फाशीची शिक्षा, ११ दोषींना मरेपर्यंत जन्मठेप*

0
1417

*Ahmedabad serial bomb blast case : मोठा निकाल*

*अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणी ३८ दोषींना फाशीची शिक्षा, ११ दोषींना मरेपर्यंत जन्मठेप*

*18, 2022, 12:31 PM*

*२००८ मधील अहमदाबादमधील २१ साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी विशेष न्यायालयाने निकाल दिला आहे. यातील ४९ दोषींपैकी ३८ जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर ११ दोषींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. २६ जुलै २००८ रोजी झालेल्या अहमदाबादमधील साखळी बॉम्बस्फोटात ५६ जणांचा मृत्यू झाला होता.*

*विशेष न्यायमूर्ती एआर पटेल यांनी निकाल देताना बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना एक लाख रुपये, तर गंभीर जखमींना ५० हजार रुपये आणि किरकोळ जखमींना २५ हजार रुपये भरपाई देण्याचा आदेश दिला आहे.