प्रा.टी.पी. मुंडे यांच्या हस्ते नागापूर नवनिर्वाचित सेवा सोसायटीच्या संचालकांचा सत्कार संपन्न!

0
389

कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा विजय !

परळी वैजनाथ प्रतिनिधी

परळी तालुक्यातील नागापूर सेवा सोसायटी च्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलला स्पष्ट बहुमत मिळाले असून नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार लोकनेते प्रा.टी.पी. मुंडे(सर) यांच्या हस्ते संपन्न झाला हा विजय केवळ कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे शक्य झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

लोकनेते प्रा.टी.पी.मुंडे (सर) यांच्या संपर्क कार्यालयात नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार संपन्न झाला. नागापूर सेवा सोसायटी ही सर्वात मोठी नागापूर परिसरातील सोसायटी आहे. या सोसायटीत एकूण तेरा सदस्य आहेत त्यापैकी सात सदस्य निवडून आले

या सेवा सोसायटी नागापुर, बहादुरवाडी, डाबी, वडखेल परचुंडी या गावांचा समावेश आहे. नवनिर्वाचित सदस्यांमध्ये अशोक ज्ञानोबा मुंडे, दीपक विश्वनाथ सोळंके ,नागोराव तुकाराम सोळंके ,परमेश्वर मोतीराम सोळंके, अँड. राहुल मदनराव सोळंके, रत्नमाला रामराव सोळंके, आत्माराम संभाजी मुंडे यांचा समावेश आहे दरम्यान प्रा.टी.पी.मुंडे (सर) यांनीनवनिर्वाचित संचालकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.तसेच यावेळी परळी मार्केट कमिटी उपसभापती प्रा. विजय मुंडे ,जि. प. सदस्य प्रदीप भैया (बबलू)मुंडे,चंद्रकांत देवकते, संतोष सोळंके, संदिपान मुंडे, चंद्रकांत मुंडे,भीमराव रुपणर,जनार्दन मुंडे,शिवराज मुंडे,अंकुश मुंडे मंगेश मुंडे आदी उपस्थित होते.