*शीतशवपेटी दान केलेल्या सामाजिक संस्थांना* *राज्यमंत्र्यांचे भावनिक आवाहन*

0
1108
Google search engine
Google search engine

 

*अमरावती दि.* 26 (विमाका) : आपल्या अत्यंत जिव्हाळ्याचे व आयुष्यभर प्राणपणाने जपलेले जिवाभावाचे नातलग सृष्टीच्या नियमाप्रमाणे एक दिवस संसाराचा निरोप घेतातच. पण त्यांच जाणं आपल्या मनाला चटका लावून जाते. आपल्या रोजच्या दिनचर्येत व्यस्त असतांना आपल्या जवळच्या कुणाच्यातरी जाण्याचा अचानक निरोप येतो. तेव्हा मनात एकाच वेळेस अनेक विचार दाटून येतात. त्या व्यक्तीचा चेहरा पाहण्यासाठी मन व्याकुळ होते. पुष्कळदा कामकाजानिमित्त दूरगावी असणाऱ्या नातलगांसाठी पार्थिव शीतशवपेटी अभावी जास्तकाळ ठेवणे शक्य होत नाही. यामुळे अनेकांना त्यांच्या जवळील व्यक्तीच्या अंतिम दर्शनापासून वंचित रहावे लागते.
जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या आईचे नुकतेच निधन झाले. दैनिक भेटी आणि बैठकांमध्ये व्यस्त असतांना त्यांना त्यांची आई गेल्याचा निरोप आला. भावनिक आवेगाने आईचा चेहरा कधी पाहतो, असे त्यांना झाले. निरोप मिळताच क्षणी ते अमरावतीहून बेलोरा गावी गेलेत. श्री. कडू यांना जाणवले की, जवळच असल्यामुळे आपण आईच्या अंतिम दर्शनाला तात्काळ पोहचू शकलो. पण अनेक बंधू-भगिनी देशातील कानाकोपऱ्यात असतात, काही परदेशातही असतात. नोकरी किंवा कामानिमित्त दूरगावी असणारे आप्त पार्थिवाच्या दर्शनापासून वंचित राहू नये, शीतशवपेटीअभावी कोणाला आपल्या जवळील व्यक्तीच्या अंतिम दर्शनाला मुकावे लागू नये म्हणून श्री. कडू यांनी आई कै. इंदिराबाई यांच्या स्मृतीपित्यर्थ शिरसगाव, कसबा, कुऱ्हा, घाटलाडकी, ब्राम्हणवाडा थडी, आसेगाव पूर्णा, चमक इत्यादी गावांमध्ये शीतशवपेटी दान करण्याचे कार्य सुरु केले आहे.

खेड्या-पाड्यातील नागरिकांना केवळ शीतशवतपेटी नाही म्हणून त्यांच्या नातेवाईकांच्या अंतिम दर्शनपासून वंचित रहावे लागू नये, यासाठी ज्या संस्थांना शीतशवपेटी दान करण्यात येत आहे त्यांनी या पेटीची व्यवस्थित निगा राखावी.तसेच सर्वसामान्य नागरिकांना गरजेप्रमाणे शीतशवतपेटी उपलब्ध करुन देण्याचे भावनिक आवाहन राज्यमंत्र्यांनी केले आहे.