बस स्थानकात प्रवाशांना सुविधा पुरवाव्यात—अँड.मनोज संकाये

0
353
Google search engine
Google search engine

बस स्थानकात प्रवाशांना सुविधा पुरवाव्यात—अँड.मनोज संकाये

परळी बस डेपोचे आगार बनले समस्यांचे माहेरघर!

परळी वैद्यनाथ/प्रतिनिधी

परळी बस स्थानकात प्रवाशांची सुविधा नसल्यामुळे हेळसांड होत आहे परळी बस डेपोचे आगार हे समस्याचे माहेरघर बनले असून येथील प्रवाशांसाठी कसली ही सुविधा बस डेपो मध्ये नाही तरी संबंधित बस डेपो व्यवस्थापक यांनी प्रवाशांना सुविधा पुरवाव्यात अशी मागणी अँड.मनोज संकाये यांनी केली आहे.

परळी हे वैद्यनाथाचे ज्योतिर्लिंग म्हणून ओळखली जाते तसेच राजकीय घडामोडी चे केंद्र आहे परळी येथे बसस्थानकात प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची स्वच्छतेची सुविधा उपलब्ध नाही त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. कोरोना काळात बस पूर्णतः बंद होत्या त्यावेळेस प्रवाशांना खाजगी वाहनधारकांनी लुटले तसेच आता संप कर्मचाऱ्यांनी पुकारला असल्यामुळे एसटी बंद आहेत तरीसुद्धा नागरिकांना खासगी वाहनाचा आश्रय घेऊन आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे त्यातच बसस्थानकात कोणतीही सुविधा प्रवाशांना उपलब्ध नसल्यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत.

परळी बस आगार हा अनेक समस्यांचे माहेरघर झाला आहे यामध्ये रोडवर खड्डे पडले आहेत तसेच संपूर्ण आगार परिसरात धुळीचे साम्राज्य आहे एवढेच नाही तर ग्रामीण भागासाठी ज्या बसेस सुटतात त्या ठिकाणी शेड आहे ते शेड पूर्णपणे नष्ट झाले आहे उन्हाळ्याचे दिवस असतानासुद्धा ग्रामीण भागातील विद्यार्थी तसेच ग्राहक यांना सावली नाही तसेच सध्या दहावीच्या परीक्षा चालू आहेत त्यांना बस बंद असल्यामुळे आपल्या सेंटरवर वेळेवर पोहोचणे जिकिरीचे झाले आहे. कालच जळगावच्या एका विद्यार्थिनीचा खाजगी ऑटो मध्ये जात असताना मृत्यू झाला तरीसुद्धा एसटी चालू नाही एकीकडे कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळे सरकार मिटवत नाही आणि दुसरीकडे निष्पाप विद्यार्थ्यांचा जीव जातो आहे त्यामुळे एसटी महामंडळातील सर्व बसेस पूर्ण क्षमतेने चालू करून प्रवाशांना सुविधा द्याव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे.