कुमावत यांचीच पुनश्च परळीत कारवाई :गुटखा माफियावर परत एकदा धाड

0
420

 

‘ पंकज कुमावत यांच्या पथकाने केली मोठी कारवाई ‘
………………………………………………………………
परळी ( प्रतिनिधी)- येथे दि.२६/०३/२०२२ रोजी ५ वा.च्या सुमारास राधेश्याम मुरलीधर लाहोटी वय ४३ वर्ष रा.सुभाष चौक, परळी हा स्वतः च्या फायद्याकरिता विनापरवाना बेकायदेशीररित्या राज्याने आरोग्याच्या दृष्टीने गुटख्यावर बंदी घातली असतांनाही रु.८०९४३ चा गोवा गुटखा,विमल, पानमसाला,बाबा पानमसाला व सुगंधी तंबाखू,आर एम डी पानमसाला,जाफराणी जर्दा, राजनिवास आदि विविध प्रकारचा गुटखा विक्री करण्यासाठी आणला होता.या कारवाईत खालील आरोपींवर भादवि कलम ३२८,२७३,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.आयपीएस अधिकारी पंकज कुमार कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.

 

सुभाष चौकातील दूकानामध्ये छापा टाकून मोठ्या प्रमाणावर गुटखा पकडण्यात आला.सरस्वती शाळेच्या बाजुला राघव इंटरप्रायझेस या किराणा दुकानांमध्ये राधेश्याम मुरलीधर लाहोटी यांनी त्यांच्या दुकानासह इतर ठिकाणी गुटखा विक्री करण्यासाठी आणुन ठेवला होता.पोलिस कर्मचारी आणि पुर्ण स्टाफसह खासगी वाहनाने येऊन परळी येथील दोन पंचासह अवैध गुटखा पकडला.आरोपी मुरलीधर लाहोटी वय ४३ यांस रंगेहाथ पकडले.तसेच,वैभव बुरांडे,फिरोज पठाण,रौफ लाला आरोपी फरार आहेत.यामध्ये एकूण मुद्देमाल ९२६२२५ जप्त करण्यात आला.
सदरील कारवाई सहायक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक भालेराव, पोना.दिलीप गित्ते, पोना.वांजरे, वंदे, होमगार्ड पवार आदींनी केली.