पी. आर. पोटे पाटील कृषि महाविद्यालयाचे विद्यार्थी शेतकऱ्यांच्या बांधावर

0
524
Google search engine
Google search engine

 

अमरावती – डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला संलग्नित व पी. आर. पोटे पाटील एजुकेशनल अॅन्ड वेलफेयर ट्रस्ट व्दारा संचालीत पी. आर. पोटे पाटील कृषी महाविद्यालय, अमरावती येथील विद्यार्थी शेतकऱ्यांच्या जनजागृती करिता “ग्रामीण जागृक्ता कार्यानुभव” सन 2022 2023 (RAWE) या कार्यक्रमा अंतर्गत कृषिदूत म्हणून अथर्व इंगोले, प्रथमेश घुरडे, अथर्व घोम व साहिल मानकर यांनी काजळी देऊरवाडा, ता. चांदूर बाजार. जि. अमरावती येथील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन माती परिक्षणासंबंधी व बिज उगवन क्षमता इत्यादिचे गरज व फायदे यावर प्रत्यक्ष शेतकन्यांच्या बांधावर जाऊन प्रात्याक्षिके दाखविले त्यांच्या शेतातील मातीचा नमुना कसा घ्यावा व बिज उगवन क्षमता बियाण्याची कशी निश्चिती करावी याबाबत खालील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी उपस्थितामध्ये –

श्री. वासुदेव सुभाषराव देशमुख, श्री. सुरेंद्र कुन्हाडे, श्री. अतुल बि. भोगाडे, श्री. यशवंतराव जी. सुने हे शेतकरी उपस्थितीत होते.

सदर प्रात्याक्षिकेच्या वेळी त्या गावाचे ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांच्या उपस्थितीत व प्रा. श्वेता देशमुख, प्रा. सागर चौकसकर, प्रा. श्रध्दा देशमुख, प्रा. अर्चना बेलसरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रात्याक्षिक पार पडले.

पी. आर. पोटे पाटील एजुकेशनल अॅन्ड वेलफेयर ट्रस्ट चे अध्यक्ष मा. श्री. प्रविणभाऊ पोटे पाटील, कृषि महाविद्यालयाचे संचालक डॉ. डी. टी. इंगोले व प्रभारी प्राचार्य, श्री. नितेश चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.