*पी. आर. पोटे पाटील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांन कडून पिंपळखुटा (अर्मळ) येथे बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक संपन्न:*

0
432
Google search engine
Google search engine

पिंपळखुटा (अर्मळ) : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित पी. आर. पोटे पाटील कृषी महाविद्यालय, अमरावती येथील ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत (RAWE) कृषीदुतांनी बीज प्रक्रियेबद्दल जनजागृती केली व तसेच बीज प्रक्रिया मुळे होणारे फायदे पटवून दिले. यावेळी कृषीदुत अभिजित भैय्यासाहेब चकवे आणी मंदार शेकोकार व मा. सरपंच आळे मॅडम, कृषी सहायक श्री. वा. चव्हाण, कृषी पर्यवेक्षक व्ही. एम.लांडे व शेतकरी प्रविण आळे, विनोद लोमटे, गजानन लुटे, रुपेश अर्मळ व इतर गावकरी प्रात्यक्षिक वेळी उपस्थित होते. बीज प्रक्रिया कशी करावी बिजप्रकियेच्या आधी बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी याची माहिती पटवून देण्यात आली. व त्यामधे वापरायचे असलेले बुरशीनाशक प्रमाण शेतकऱ्यांना देण्यात आले तसेच या तिन्ही ( १. पहिली : २.५ ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति किलो बियाणे २. दुसरी : ६ मिली रायझोबियम सोयाबीन गट + ६ मिली पी. एस. बी + ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रति किलो बियाणे) जैविक घटकांना एकत्रीत करून यामधे २०० लिटर गुळाचा पाक ३ कीलोसाठी मिसळून हे द्रावण जर आपण बियाण्यास लावले तर बियाण्याची उगवण क्षमता सुधारते व ते निरोगी राहते या घटकाबद्दल माहिती दिली. ग्रामीण कृषी जागरूकता कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य नितेश चौधरी, कार्यक्रम समन्वयक प्रा. श्री राहुल कळसकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. श्री. हेमंत पवार, प्रा. श्वेता देशमुख, प्रा. श्रद्धा देशमुख, प्रा. डॉ. अर्चना बेलसरे यांचे तसेच विषय शिक्षक प्रा. श्री. राहुल कळसकर(वनस्पतीशास्त्र व रोगनिदानशास्त्र विभाग) यांचे मार्गदर्शन मिळाले. व संस्थेचे अध्यक्ष मा. प्रवीण भाऊ पोटे पाटील तसेच कृषी महाविद्यालयाचे संचालक डॉ. डी. टी. इंगोले यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.