सैनिकांच्या बरोबर सर्व सामान्य जनतेची कामे मार्गी लागण्यासाठी प्रशासनाने काम करावे : अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची मागणी : प्रांताधिकाऱ्यांना दिले निवेदन*

Google search engine
Google search engine

सांगली/कडेगांव न्युज
“अमृत जवान सन्मान दिनाचे” आयोजन करून सैनिकांचे शासन दरबारी असणारी प्रलंबित कामे मार्गी लागण्यासाठी प्रशासन काम करत आहे. त्याच पध्दतीने सर्व सामान्य जनतेची शासन दरबारी असणारी कामे ग्राहक संरक्षण कायद्यानुसार भ्रष्टाचारमुक्त करून सर्व सामान्य जनतेस न्याय मिळवून द्यावा. अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत कडेगाव तालुका संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.
येथील तहसील कार्यालयात प्रशासनाने तालुक्यातील सैनिक, शहीद जवान, विधवा, जवानांचे कुटुंबीय व सेवेत कार्यरत सैनिकांची शासन दरबारी प्रलंबित असणाऱ्यांना कामाचा निपटारा जलद गतीने होण्यासाठी विशेष अभियान राबविले आहे. प्रशासनाच्या या उपक्रमाचे अखिल भारतीय ग्राहक पंचायत कडेगाव तालुका यांच्यावतीने संघटनेचे मार्गदर्शक फडणीस नाना ऊर्फ विठ्ठल पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी व तहसीलदार यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच ज्या पद्धतीने प्रशासनाने सैनिकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी विशेष अभियान राबविले त्याच पध्दतीने सर्व सामान्य जनतेची शासन दरबारी असणारी कामे तात्काळ पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावा. ग्राहक संरक्षण कायद्यानुसार सर्व सामान्य जनतेची कामे भ्रष्टाचार मुक्त करून त्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे.
यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राजेंद्र मोहिते, हणमंतराव मोहिते, गो.रा.पवार, विनायक पवार, रमेश पवार, उमेश आमने, सुवर्णा पाटील, प्रेमला पाटील, सुषमा मांडके यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. बरोबर सर्व सामान्य जनतेची कामे मार्गी लागण्यासाठी प्रशासनाने काम करावे : अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची मागणी : प्रांताधिकाऱ्यांना निवेदन*

“अमृत जवान सन्मान दिनाचे” आयोजन करून सैनिकांचे शासन दरबारी असणारी प्रलंबित कामे मार्गी लागण्यासाठी प्रशासन काम करत आहे. त्याच पध्दतीने सर्व सामान्य जनतेची शासन दरबारी असणारी कामे ग्राहक संरक्षण कायद्यानुसार भ्रष्टाचारमुक्त करून सर्व सामान्य जनतेस न्याय मिळवून द्यावा. अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत कडेगाव तालुका संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.
येथील तहसील कार्यालयात प्रशासनाने तालुक्यातील सैनिक, शहीद जवान, विधवा, जवानांचे कुटुंबीय व सेवेत कार्यरत सैनिकांची शासन दरबारी प्रलंबित असणाऱ्यांना कामाचा निपटारा जलद गतीने होण्यासाठी विशेष अभियान राबविले आहे. प्रशासनाच्या या उपक्रमाचे अखिल भारतीय ग्राहक पंचायत कडेगाव तालुका यांच्यावतीने संघटनेचे मार्गदर्शक फडणीस नाना ऊर्फ विठ्ठल पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी व तहसीलदार यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच ज्या पद्धतीने प्रशासनाने सैनिकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी विशेष अभियान राबविले त्याच पध्दतीने सर्व सामान्य जनतेची शासन दरबारी असणारी कामे तात्काळ पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावा. ग्राहक संरक्षण कायद्यानुसार सर्व सामान्य जनतेची कामे भ्रष्टाचार मुक्त करून त्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे.
यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राजेंद्र मोहिते, हणमंतराव मोहिते, गो.रा.पवार, विनायक पवार, रमेश पवार, उमेश आमने, सुवर्णा पाटील, प्रेमला पाटील, सुषमा मांडके यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.