सांगली जिल्ह्यातील कडेगांव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांनी नगरपंचायत कर्मचाऱ्यांना स्वखर्चाने रेनकोट भेट देत जपली बांधिलकी.यालच म्हणतात कर्तव्यदक्ष युवा नगराध्यक्ष..

Google search engine
Google search engine

सांगली/कडेगांव न्युज

संपूर्ण राज्यामध्ये पावसाने जोर धरल्यामुळे अनेक भागात महापूर आलेला आहे यामध्ये केंद्र व राज्य सरकारकडून बचाव कार्य केले जात आहे. कडेगाव शहरांमध्ये गेली चार-पाच दिवस पावसाने चांगलाच जोर धरलेला आहे. त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाचे पाणीपुरवठा
,आरोग्य व स्वच्छता कर्मचाऱ्यांना पावसामध्ये काम करावे लागत आहे, या कर्मचाऱ्यांना सेवा बजावताना त्रास होऊ नये यासाठी कडेगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष धनंजय(भैय्या)देशमुख यांनी कर्मचाऱ्याना पावसाळी रेनकोट देत बांधिलकी जपली आहे.रेनकोट
दिल्यामुळे नगरपंचायत कर्मचारी नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांच्या या कार्याबद्दल समाधानाची व कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष अशी भावना व्यक्त करत होते.
हा रेनकोट वाटपाचा
कार्यक्रम नगरपंचायतीच्या सभागृहामध्ये संपन्न झाला.
यावेळी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी कपिल जगताप, नगरसेवक. पै.अमोल डांगे, नगरसेवक.मनोज मिसाळ, विरोधी पक्षनेते. विजय शिंदे,नगरसेवक.श्रीमंत शिंदे, नगरसेवक.हाजी.मुक्तार पटेल,नगरसेवक.युवराज राजपूत, नगरसेवक.अभिजीत लोखंडे नगरसेवक सिद्दीक पठाण,शशिकांत (तात्या)धर्मे,राकेश जरग यांच्या सह नगरपंचायतीचे सर्व कर्मचारी कडेगाव ग्रामस्थ उपस्थित होते.