क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठाच्या वतीने क्रांतिसिंह नाना पाटील सामाजिक पुरस्कार काॅम्रेड वृंदाताई करात यांना जाहीर

Google search engine
Google search engine

सांगली न्युज.
क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापिठचे विद्यमाने दिला जाणारा ” क्रांतिसिंह नाना पाटील सामाजिक पुरस्कार ” चालुवर्षी कॉम्रेड वृंदाताई करात यांना देणेत येणार आहे. कॉम्रेड वृंदा करात या पश्चिम बंगाल मधील असून विद्यार्थी परिषदे पासून एस.एफ.आय. या लढाऊ संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थी प्रश्नावर संघर्ष करत आल्या आहेत. लंडन येथील एरय इंडीयाच्या प्रशासनाविरुद्ध त्यांनी हवाई सुंदरीच्या युनिफाॅर्मसाठी संघर्ष करुन आपले म्हणणे मान्य करुन घेतले. दिल्लीमधील कापड गिरणी मजुरामध्ये आल् सिटु या कामगार संघटनेच्या माध्यमातून काम केले .२००५ मधे पश्चिम बंगालमधुन त्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने राज्यसभेच्या सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या एक अत्यंत जागरुक आणि लढावू खासदार म्हणून त्यांनी प्रभावी काम केले आहे . त्याचवेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलीट ब्युरो या सर्वोच्च बाॕडीमध्ये त्यांची निवड झाली. परवा परवा दिल्लीमधे सरकार दिल्ली पोलीसांच्यामदतीने बेकायदेशिरपणे सामान्य लोकांच्या राहत्या घरावर बुलडोजर फिरवायला लागले , त्यावेळी दिल्लीतील इतर विरोधी पक्ष गप्प राहुन तमाशा पहात होते , त्यावेळी वृंदाताई सर्वोच्च न्यायालयाची मनाई घेऊन सत्तांध सरकारच्या बुल्डोजरच्या विरोधात भक्कम भिंत बनून उभ्या राहील्या.सामान्य माणसाला दिलासा दिला . सामान्य माणसाप्रती असलेली त्यांची बांधीलकी आणि योगदान लक्षात घेऊन क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापिठाने त्यांना आपला हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्याचे निश्चित केले आहे . दि. ६ अॉगष्ट २०२२ रोजी दुपारी १.३० वाजता विटा येथे क्रांतिसिंह नाना पाटील सभागृहात प्रा. डॉ तारा भवाळकर यांचे अध्यक्षतेखाली मा. प्राचार्य विश्वास सायनाकर यांचे हस्ते हा पुरस्कार कॉम्रेड वृंदाताई करात याना प्रदान करण्यात येणार आहे. मानपत्र , सन्मानचिन्ह , शाॕल , श्रीफल , आणि रु. २१०००/- असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
या आगोदर आचार्य शांताराम गरुड , क्रांतिवीर नागनाथ आण्णा , प्रा. डाॕ. एन. डी. पाटील , मा. आमदार भाई गणपतरावजी देशमुख , साथी मृणालताई गोरे, मेघाताई पाटकर , मा. विकासभाऊ आमटे .प्रा. डॉ. आ. ह. साळुंखे , डाॕ. अभय बंग , पर्कार पी साईनाथ , कॉ. अशोक ढवळे, कॉम्रेड सिताराम येंचुरी , भाषातज्ञडाॕ. गणेश देवी , कॉम्रेड भालचंद्र कानगो आशा व्यक्तीना देण्यात आला आहे.