चांदुर बाजार / बोराळा:
पी.आर.पोटे पाटील एज्युकेशन अँड वेल्फेअर ट्रस्ट अमरावती द्वारा संचालित डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नीत पी. आर. पोटे पाटील कृषी महाविद्यालय ,अमरावती मधील अंतिम वर्षातील विद्यार्थिनींनी ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत बोराळा येथे शेतकऱ्यांना ई – पीक पाहणी बाबत माहिती दिली,अॅप डाऊनलोड कसे करावे, मोबाईल मधून ई – पीक पाहणी कशी करावी, ई – पीक पाहणीचे फायदे काय याबाबत माहिती देऊन प्रात्यक्षिक करून दाखवले.यावेळी शेतकरी रमेश ठाकरे, सचिन ठाकरे, प्रमोद शेकार, प्रदीप पाठक, व इतर गावकरी उपस्थित होते.सदर कार्यक्रम महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी तनुजा नागपुरे, श्रद्धा सदाफळे, समृध्दी पूनसे यांनी प्रा. राहूल कळसकर यांच्या मार्गदर्शनात पार पाडला. कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वैभव लाजुरकर, उपप्राचार्य प्रा.नितेश चौधरी, कार्यक्रम समन्वयक प्रा.श्री राहुल कळसकर, कार्यक्रम अधिकारी प्रा.श्री. हेमंतकुमार पवार, प्रा.श्वेता देशमुख, प्रा.श्रद्धा देशमुख, प्रा.डॉ.अर्चना बेलसरे यांचे मार्गदर्शन मिळत असून संस्थेचे अध्यक्ष मा. प्रवीण भाऊ पोटे पाटील तसेच कृषी महाविद्यालयाचे संचालक डॉ. डी. टी. इंगोले यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.