पत्रकारांना ६० वर्षानंतर पेेंशन लागू झाली पाहिजे ही मागणी पुढे रेटणार :- ठाणे येथील आमदार संजय केळकर यांची ग्वाही

0
366
Google search engine
Google search engine

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ ऑल इंडियाचे ठाणे मध्ये अधिवेशन

अमरावती – (प्रतिनिधी)

कोरोना काळात उत्कृष्ठ कार्य पत्रकारांनी केले आहे. समाजाला सुधारण्याची व समाजाला योग्य दिशेने नेण्याची ताकद पत्रकारांच्या लेखनीत असुन तलवारीपेक्षा लेखनी हे प्रभावी शस्त्र आहे. ग्रामीण भागातील पत्रकारांना ६० वर्षानंतर पेेंशन लागू झाली पाहिजे ही मागणी पुढे रेटणार अशी ग्वाही आमदार संजय केळकर यांनी दिली. ते अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ ऑल इंडियाचे पत्रकारांच्या अधिवेशनात बोलत होते.

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ ऑल इंडिया चे पत्रकारांचे एकदिवसीय महाराष्ट्र राज्यस्तरीय अधिवेशन व मार्गदर्शन शिबीर ठाणे येथील रामगणेश गडकरी रंगायतन येथे सोमवारी पार पडले. याचे उद्घाटन आमदार संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ. भा. ग्रा. पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष मनोहर सुने हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय उपाध्यक्ष राजेंद्र भुरे, प्रदेशाध्यक्ष कैलासबापू देशमुख, उद्योजक चंद्रकुमार उर्फ लप्पीसेठ जाजोदीया, प्रदेश सरचिटणीस प्रा. रवींद्र मेंढे, संपर्क प्रमुख बाळासाहेब सोरगिवकर, रूद्र प्रतिष्ठान धनंजय सिंह, आळंदी येथील ह. भ. प. साध्वी वैष्णवी दिदि सरस्वती, माणिकराव ठाकरे, ॲड. संदीप लेले, संपादक सुुकृत खांडेकर, देवेंद्र भुजबळ, विलास खानवोलकर, अमरावती जिल्हाध्यक्ष प्रदीप जोशी आदींची मंचावर उपस्थिती होती. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदेशाध्यक्ष कैलासबापू देशमुख यांनी करून पत्रकार संघाविषयीची माहिती दिली. पत्रकारीता करीत असतांना अनेक वर्ष एकाच ठिकाणी काम न करता पत्रकारितेमध्ये पुढे जाण्याची जिद्द ठेवा व नैराश्य कधी होऊ नका असे मत प्रहारचे संपादक सुुकृत खांडेकर यांनी व्यक्त केले. तर किर्तनकार साध्वी वैष्णवी दिदि सरस्वती यांना मनोगत व्यक्त करतांना वृत्तपत्र हा माझा किर्तनकार होण्याचा मुळ पाया आहे असे म्हटले. या अधिवेशनादरम्यान विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे संचलन दिनेश गोसावी यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. रवींद्र मेंढे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता अ. भा. ग्रा. पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष मुनीर खान व इतर ठाणे येथील पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. अधिवेशनाकरिता राज्यातील विविध जिल्ह्यातून पत्रकार बांधव उपस्थित होते.