*अमरावती ब्रेकिंग :- मोठ्या प्रमाणात गांजा ची वाहतूक करणाऱ्या 4 आरोपींना अटक ; 435 किलो गांजा सहित 3 वाहने ताब्यात*

0
9384
Google search engine
Google search engine

चांदुर रेल्वे :-

चांदुर रेल्वे :- आंध्र प्रदेशातुन पांढरकवडा-यवतमाळ-बाभूळगाव-चांदुर रेल्वे मार्गे अमरावती येथे ट्रक मधून गांजा तस्करी होत असल्याच्या गुप्त माहिती वरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री तपन कोल्हे यांनी स्वतः ह चांदुर रेल्वे ते अमरावती रोडवरील मालखेड गार्डन फाट्याजवळील न्यू बादल हॉटेल समोर नाकाबंदी करून चार  आरोपीं ज्यात
ऋषभ मोहन पोहोकार , वय 25 वर्ष रा.रिद्धपुर ता.मोर्शी जि.अमरावती

विक्की बस्तीलाल युवनाते, वय 20 वर्षे रा.शिरजगाव कसबा ता.चांदुर बाजार जी.अमरावती

शेख अरबाज शेख इलियास, वय 19 वर्ष रा.आजाद नगर अमरावती

शेख तौसिफ शेख लतीफ, वय 19 वर्ष रा. रतनगंज खुर्शीदपुरा अमरावती  

यांचा सहित 1 आयशर ट्रक मधून खाली असलेल्या प्लास्टिक कॅरेट खालून 435 किलो ग्राम वजनाचा गांजा  जप्त केला आहे तसेच आयशर ट्रक व ट्रकचा आजूबाजूला माहिती देण्यासाठी वापरण्यात आलेली दोन 4 व्हीलर जप्त करण्यात आल्या आहेत. एकूण 74 लाख 20 हजार 600 रुपये  च्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री अविनाश बारगळ अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव, उपविभागीय पोलीस अधिकारी चांदुर रेल्वे श्री जितेंद्र जाधव, यांचे मार्गदर्शनात पो.नि. स्थानिक गुन्हे शाखा श्री तपन कोल्हे, यांचे नेतृत्वात सर्व श्री पोलीस निरीक्षक नितीन चुलपार, संतोष मुंदाणे , रविंद्र बावणे , बळवंत दाभने, पंकज फाटे , दिनेश कनोजिया, मूलचंद भांबुरकर , मोहन मोरे , अमोल देशमुख,विलास रोकडे, निलेश डांगोरे नितीन कळमकर,प्रमोद शिरसाठ यांनी केली आहे