*१५०० विद्यार्थ्यांच्या कला-गुणांचा गणेशाेत्सव…* *श्री आर्ट कला वर्ग व कला निर्मीतीचा १० वा गणेशाेत्सव : विविध उपक्रमांचे आयाेजन*

0
321
Google search engine
Google search engine

 

अमरावती दि.४ : श्री गणेश विद्येचे आराध्य, संकट निवारण करणारे तसेच कला, काैशल्याची गुणवर्धक म्हणून दैवत म्हणून सर्वत्र भक्तीभावाने पुजल्या जाते. आज गणेशाेत्सव सर्वत्र माेठ्या हर्षाेल्हासात साजरा हाेत असतांना अमरावती शहरातील हजाराे हातांना कला गुणांचे वरदान देणारे श्री आर्ट कला वर्ग व कला निर्मीती येथे यंदा 10 वा गणेशाेत्सव माेठ्या उत्साहात व भक्तीभावात साजरा हाेत आहे.

डिजीटल पाेर्टेट, चित्रकला या क्षेत्रात नावाजलेले श्री आर्ट कला व कला निर्मीतीचे संस्थापक प्रा. सारंग नागठाणे यांनी या श्री आर्ट कला वर्गाची २०१४ मध्ये स्थापना केली. स्थापनेच्या पहिल्याच वर्षी शिवकुमार सहारे, परविन बानाे, पुजा हेडाऊ, भाग्यश्री माेराडकर या केवळ चार विद्यार्थ्यांनी गणेशाेत्सवाची मुहूर्तमेढ राेवली आणि त्यानंतर सगल दहा वर्षांपासून साजरा हाेणारा हा गणेशाेत्सव यंदा १५०० विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून साजरा हाेत आहे.

या उत्सवाच्या निमीत्त्याने श्री कला आर्ट वर्गाच्या निमित्याने स्पर्धाचे आयाेजन करण्यात येत असून दरवर्षी प्रमाणे यंदाही १०० विद्यार्थ्यांनी गणपती सजावट व गणपती स्पर्धेत सहभाग नाेंदविला आहे. संचालक प्रा. सारंग नागठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली मातीचे गणपती, मुर्ती रंगविणे अशा विविध स्पर्धांमध्ये २०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला हाेता.

मुलांमधील सुप्त कला गुणांना वाव देण्याèया श्री कला आर्ट वर्ग आता राष्ट्रीय व आतंरराष्ट्रीयस्तरावर यशस्वीरित्या आपल्या काैशल्य सिद्ध करीत आहे. विविध राज्यांमध्ये पार पडलेल्या स्पर्धांमध्ये येथील विद्यार्थ्यांनी सुवर्ण, रजत इतर इतर पदक व बहूमान पटकावला आहे. या क्षेत्राला एक माेठं व्यवसायिक क्षेत्र असून राेजगार व स्वयंराेजगार खात्रीशीर संधी असून त्यामध्ये फाऊंडेशन एटीडी, सीटीसी, बीए\ए व महाराष्ट शासनाच्या एलीमेंटरी व इटरमिजीएट परिक्षेमध्ये प्रवेशाद्वारे आपल्या कला गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना त्यांचे भवितव्य साकारता येत आहे.

श्री आर्ट कला वर्ग सण-उत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये कलागुणांचा आविष्कार करीत असून यंदाचा गणेशाेत्सव अशीच अनुभूती देणारा असल्याचे दिसत आहे. अशा या कला वर्गाला आपण सर्वानी एकदा भेट द्यावी ही विनंती….

प्रा सारंग नागठाणे
श्री आर्ट कला वर्ग व कला निर्मिती अमरावती
घनश्याम नगर साई नगर रोड सातुर्णा अमरावती
8888344370