हिंदूंच्याच सणांना लाईट कशी जाते निरंतर हा प्रकार सुरू असतो: वैद्यनाथभक्ती मंडळ

0
391
Google search engine
Google search engine

वैद्यनाथ भक्ती मंडळाची अनोखी गांधीगिरी ; महावितरण अधिकारी उपस्थित नसल्याने निवेदन भिंतीवर चीटकवत केली घोषणाबाजी

बीड परळी : शहरातील लाईट तासान तास गायब असल्याने शहरातील वैद्यनाथ भक्ती मंडळाने आज महावितरण अधिकारी कार्यालयात नसल्या कारणाने निवेदन भिंतीवर चीटकवत अनोखे आंदोलन केले.
सविस्तर माहिती अशी की, परळी शहरातील लाईट ऐन सणासुदीत गायब असल्याने शहरातील नागरिक संतप्त असून आज आज शहरातील वैद्यनाथ भक्ती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शहरातील महावितरण कार्यालय निवेदन देण्याचे ठरवत कार्यालय थेट धडक दिली मात्र आज रविवार असल्याने कार्यालयात कोणी उपस्थित नव्हते यावेळी मंडळाच्या सदस्यांनी आक्रमक होत अधिकारी आणि कर्मचारी विरोधात घोषणाबाजी करत निवेदन कार्यालयाच्या भिंतीवर चीपकवले. यावेळी विशेष म्हणजे कार्यालयाच्या आवारात एक ही कर्मचारी अथवा सुरक्षा रक्षक उपस्थित नसताना फॅन चालू होते, शहरातील लाईट गायब असताना MSEB कार्यालयात हा प्रकार दिसल्याने यांना याचा जाब कोण विचारणार असा प्रश्न देखील यावेळी वैद्यनाथ भक्ती मंडळाच्या सदस्यांनी उपस्थित केला.
यावेळी भक्ती मंडळाचे ओमकार मिरकले, दीपक जोशी, कृष्णा बेदरकर, हनुमंत गित्ते, दिनेश लोंढे, शिवशंकर मुंडे, रघुवीर राडीकर आदी सदस्य उपस्थित होते.