ज्येष्ठ गौरीचा पांडुरंग वारीआकर्षक देखावा.

0
478
Google search engine
Google search engine

 सूर्यवंशी कुटुंबीयांचा स्तुत्य उपक्रम 

शेगाव:– स्थानिक जगदंबा नगर परिसरात राहत असलेले सूर्यवंशी कुटुंबियांनी त्यांच्या घरी महालक्ष्मी उत्सवानिमित्त ते दरवर्षी आगळावेगळा देखावे सादर करीत लोकांना आकर्षित करीत असतात. असाच देखावा यावर्षी श्री विठ्ठल दर्शनाचा पांडुरंग वारी हाआकर्षित असा देखावा केला होता. हा देखावा पाहण्यासाठी व ज्येष्ठ गौरीचे दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. सौ.कृतीता विशाल सुर्यवंशी व सौ.आरती सागर वानखेडे ह्या दोघी मिळून दरवर्षी महालक्ष्मी उत्सवा दरम्यान सामाजिक व धार्मिक विषयांवर विविध आकर्षक देखावे सादर करीत असतात गेल्या वर्षी त्यांनी कोरोना महामारी वर स्टे होम,स्टे लाईफ असा देखावा बनविला होता यावर्षी त्यांनी आषाढी एकादशी निमित्त पंढरीच्या भेटीला जाणाऱ्या वारकरी संप्रदायाचा देखावा सादर केला होता या देखावयात त्यांनी श्री विठ्ठलाची देखणी प्रतिमा रांगोळी द्वारे साकारली होती त्यांच्या या देखाव्यामुळे भाविकांना दरवर्षी वेगवेगळे देखावे पहावयास मिळत असल्याने या देखावां उपक्रमाची परिसरात कौतुक होत आहे.