श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत राडा ; गर्दी पांगविण्यासाठी सौम्य लाठी चार्ज

0
2738

अमरावती : स्थानिक श्री शिवाजी शिक्षण संस्थेची पंचवार्षिक निवडणूक रविवारी सकाळी ८ वाजल्यापासून प्रारंभ झाली. मतदान प्रक्रिया सुरू असताना मोर्शी मतदार संघाचे आमदार श्री देवेंद्र भुयार हे थेट मतदान केंद्रात गेले. परंतु त्यांचे मतदान नाही त्यांनी आतमध्ये प्रवेश केला कसा? अशी विचारणा विकास पॅनलच्यावतीने करण्यात आली. त्यानंतर यावरून वाद झाला. तू -तू मै- मै झाली. दोन्ही गट अमोर- समोर आले. अखेर पोलिसांना मध्यस्थी करावी लागली.गर्दी पांगविण्यासाठी सौम्य लाठी चार्ज करून परिस्थिती नियंत्रण आणली.