संत नगरीत गणेश विसर्जनाचा सोहळा संपन्न!

0
447
Google search engine
Google search engine

पर्यावरण पूरक – प्रदूषण मुक्त अशी संकल्पना घेत नगरपरिषदेची उत्तम कामगीरी

शेगांव:- नुकत्याच झालेल्या श्रीगणेश विसर्जनामध्ये यावर्षी नगरपरिषद कडून उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. तलाव, नदी व विहिरी इतर स्त्रोत दूषित होता कामा नये आणि पर्यावरणाचे प्रदूषण होऊ नये यासाठी नगरपरिषद कडून गावाच्या तीन ठिकाणी श्रीगणेश विसर्जनाची उत्तम अशी व्यवस्था करण्यात आली होती.

विसर्जनासाठी यासंबंधीची माहिती जनतेसाठी प्रसारित करण्यात आली आणि त्यासाठी कृत्रिम तलाव तसेच फायबरची सुंदर असे कळस, यामध्ये निर्मल्य टाकण्याची सुविधा करण्यात आली होती. तसेच शहरातील गणेश भक्तांनी याचा उपयोग करीत आनंद व्यक्त केला.

आमच्या प्रतिनिधींनी याबद्दल शहरातील जनतेशी संवाद साधला असता, त्यांनी नगरपरिषद कडून केलेल्या संपूर्ण व्यवस्थेबद्दल माहिती घेत, जनतेने याबद्दल आनंद व्यक्त केला, विसर्जनाची सुविधा पाहता खूप आनंद होत आहे, सोबत आज आपल्या गावाची श्रद्धा देखील वाढली. विशेष करून लहान मुलांनी विसर्जनाचा खूप आनंद घेतला. सोबत त्याठिकाणची आजूबाजूची असलेली स्वच्छता देखील चांगली होती म्हणून बाप्पाची विसर्जन करत असताना समाधान वाटले अशा प्रतिक्रिया जनतेने दिल्या तर नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी सौ. काटकर मॅडम तसेच आरोग्य विभागाचे इंजी. मोकासरे साहेब व सर्व कर्मचारी वृंदाचे अभिनंदन केले.

सोबतच बाप्पाची मिरवणूक शहराची परिक्रमना करीत असतांना काही सेवाभावी लोकांनी गणेश भक्तांसाठी प्रसादाची व्यवस्था केली होती. त्यात जुना गजानन महाराज मंदिर रोड वरील सिद्धिविनायक गेस्ट हाऊस येथे “बेसन व पोळीचा” प्रसाद वाटप करण्यात आला होता त्यामध्ये हरीष भुतडा, संतोष काकपुरे, अशोक भांड, श्याम भुतडा व सर्व नवदुर्गा मंडळ भवानी पार्किंगचे सदस्यांनी सहकार्य केले.

मागील वर्षीची बाप्पाची विसर्जन व्यवस्थेत जी विटंबना झाली होती त्याचा प्रहार संघटनेने निषेध सुद्धा व्यक्त केला होता.परंतु यावर्षी व्यवस्था पाहता संघटनेने नगरपरिषदेचे आभार मानत धन्यवाद म्हटले अशीच सुंदर व्यवस्था होत राहावी अशी अपेक्षा केली.