*तृतीयपंथीयांच्या नोंदणी प्रमाणपत्र* *व ओळखपत्रासाठी विशेष मोहीम*

0
239
Google search engine
Google search engine

*अमरावती, दि. 21 (जिमाका) :* समाजकल्याण विभागामार्फत सेवा पंधरवडा कालावधीत तृतीयपंथीयांना नोंदणी प्रमाणपत्र व ओळखपत्र उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. ही मोहीम 2 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. यासाठी तृतीयपंथीयांनी सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयात संपर्क साधावा अथवा http://transgender.dosje.gov.in या पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन सहायक आयुक्त माया केदार यांनी केले आहे.
तृतीयपंथी हा समाजातील एक दुर्लक्षित घटक असून त्यांना समाजाकडून भेदभावाची वागणूक मिळते. या घटकाला समाजाच्या विकासप्रक्रियेत सहभागी करुन घेण्यासाठी शासनामार्फत विविध उपक्रम राबविले जातात. शासनाच्या योजनांचा त्यांना लाभ मिळावा, त्यांच्या तक्रारींचे निवारण करता यावे यासाठी तृतीयपंथीयांची शासनाच्या पोर्टलवर नोंदणी आवश्यक आहे.
तृतीयपंथीयांचे कल्याण व त्यांच्या हक्काचे संरक्षण अभियानांतर्गत ही मोहीम राबविण्यात येत असून यासाठी नोंदणी अभियान सुरु आहे. जिल्ह्यातील सर्व तृतीयपंथीयांनी या नोंदणी अभियानात सहभाग घेण्याचे आवाहन समाज कल्याण विभागामार्फत करण्यात आले आहे.