कन्हेरवाडी येथील डीपी दुरुस्त झाल्या नाही तर मार्केट कमिटीचे संचालक तथा युवा नेते माणिकभाऊ फड यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार…

0
355
Google search engine
Google search engine

मौजे कन्हेरवाडी येथील तळ्यातील डीपी, बुद्ध विहार समोरील डीपी, खारीतील (शेत) डीपी, चिंच कडे जाणाऱ्या मार्गावरील डीपी, जिल्हा परिषद शाळेजवळील लिंबारा मार्गावरील डीपी, आनंद नगर येथील डीपी व इतर ठिकाणच्या डीपी काही दिवसापासून बंद आहेत. यामुळे संपूर्ण नागरिकांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे यामुळे सुमारे 80 ते 90 टक्के गाव अंधारमय झालेले आहे. याबाबत वेळोवेळी संबंधितांना दूरध्वनीवरून व प्रत्यक्ष भेटून विनंती करून या बाबीकडे प्रशासनाने पूर्णतः दुर्लक्ष केलेले आहे. डीपी बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे व अंधाराचा फायदा चोर, लुटारू घेऊन गावकऱ्यांना मोठी हानी पोहोचू शकतात.

तरी आपणास नम्र विनंती की सदरील प्रकरणी तात्काळ कनेरवाडीतील सर्व बंद असलेल्या डीपी पूर्ववत कराव्यात अन्यथा समस्त गावकऱ्यांच्या वतीने मार्केट कमिटीचे संचालक तथा युवा नेते माणिकभाऊ फड यांच्या नेतृत्वाखाली परळी अंबाजोगाई राष्ट्रीय महामार्गावर कन्हेरवाडी येथे दिनांक 27 सप्टेंबर 2022 रोजी परळी महावितरण कार्यालयाचा निषेध म्हणून रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असे असे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी सर्व गावकऱ्यांनी माणिकभाऊ फड यांच्या नेतृत्वात मा.मंत्री मा.श्री.धनंजयजी मुंडे साहेब यांची भेट घेऊन संबंधित प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली, यावेळी साहेबांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावून चर्चा केली व तात्काळ प्रश्न मार्गी लावण्यास सांगितले यावेळी महावितरण कंपनीचे मुख्य अभियंता लटपटे साहेब, अध्यक्षक अभियंता निकम साहेब, अतिरिक्त कार्यकारी अभियंता वाघमारे साहेब, शाखा अभियंता राठोड साहेब अंबाडकर साहेब हे उपस्थित होते.