ई-पीक पाहणी नोंदविण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी शेगाव चे तहसीलदार शेतकऱ्यांच्या बांधावर

0
212
Google search engine
Google search engine

विनायक देशमुख :- शेगांव:

 

शेतकऱ्यांना सातबारावर पिकाची अचूक माहिती भरण्यासाठी राज्य सरकारने ई-पीक पाहणी अॅप सुरू केले आहे. महसूल आणि कृषी विभागातर्फे संयुक्तपणे हा उपक्रम राबविला जात आहे. माझी शेती माझा सातबारा, माझा पिक पेरा यासाठी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पीक पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. शेगांव तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये ई-पीक पाहणी अॅपला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

शेगांव चे तहसीलदार समाधान सोनवणे स्वतः शेगांव तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीच्या बांधावर जाऊन ई-पीक पाहणी नोंदविण्याचे प्रशिक्षण देत असून त्यांच्या अधिनस्त असणारी संपूर्ण यंत्रणा दैनंदिन विविध शेतातील बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहे. शेतकऱ्यांना रब्बी पिकाचा पिक पेरा भरण्यासाठी मोबाईलद्वारे ई पिक पहाणी ॲप वर रब्बी पिका चा पेरा भरण्याची सुविधा देण्यात आली असून याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन तहसील दार समाधान सोनवणे यांनी केले आहे. या अॅपमुळे आता शेतकऱ्यांना तलाठ्या कडे जाण्याची गरज राहणार नाही शेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पीक पेरा भरण्याचे मार्गदर्शन तहसीलदार समाधान सोनवणे यांनी शेतकऱ्यांना केले यावेळी या कार्यक्रमाला मंडळ अधिकारी एस टी ढमाळ, मंडळ अधिकारी राजू पदमने, तलाठी श्रीकांत हाके, तलाठी के के तायडे, तलाठी शेख व जवळा परिसरातील शेतकरी व महसू विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.