अकोट-शेगाव मार्गावरील पुलावर ट्रक अडकल्याने ६ तासांपासून वाहतूक ठप्प ! लोहारा गावाजवळील जवळील घटना

0
326

(बुलढाणा) – विनायक देशमुख :- 

बुलडाणा आणि अकोला जिल्ह्याच्या सीमेवरील शेगाव – अकोट राज्यमार्गावरील लोहारा गावाजवळ असलेल्या मन नदीच्या पुलावर इंग्रजकालीन पूल बांधलेले आहे. काही दिवसापूर्वी अकोट-शेगाव मार्गावरील लोहारा गाव जवळील मन नदीवरील पुलाचा काही भाग खचला होता.त्यात कोंबड्या घेऊन टेम्पो पलटी झाला होतो. आता आज पहाटे पुन्हा याच ठिकाणी मालवाहू ट्रक अडकला आहे. यामुळे अकोट शेगाव या राज्य मार्गावरील वाहतूक पुन्हा बंद झाली असून ६ तास उलटले तरी वाहतूक सुरु झालेली नाही.
शेगाव – अकोट राज्यमार्गावरील बुलढाणा आणि अकोला जिल्ह्याच्या सीमेवरील मन नदीवर इंग्रज कालीन पूल बांधलेले आहे. सदर पूल नादुरुस्त असल्याने या ठिकाणी नवीन पुलाचे बांधकाम सुरु आहे. मात्र सदर बांधकाम संथ गतीने सुरु असल्याने याचा फटका वाहन चालकांना बसत आहे.आज पहाटे ४ वाजेच्या सुमारास अकोट वरून शेगाव कडे सोयाबीन घेऊन जाणारा ट्रक हा ऐन पुलावर येऊन नादुरुस्त झाला. यामुळे या मार्गावरील वाहतूक ६ तास झाले तरी सुरळीत झालेली नाही. या ठिकाणी वाहनाचा अपघात होऊ नये यासाठी शेगाव -अकोट राष्ट्रीय महामार्ग हा वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. या मार्गावर वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.