शेगाव-खामगाव रोडवर अपघाताची मालिका सुरुच ; लक्झरी व रेती वाहतूक करणाऱ्या टिप्पर मध्ये अपघात; ६ प्रवासी जखमी

0
372
Google search engine
Google search engine

 

विनायक देशमुख / बुलढाणा:

 

पुण्यावरून शेगावकडे येणाऱ्या मनस्वी ट्रॅव्हल्सच्या खाजगी लक्झरी बसला आज सकाळी भरधाव वेगाने येणाऱ्या रेतीच्या टिप्परने अमोरासमोर धडक दिली.या अपघातामध्ये लक्झरी बसच्या चालकासह सहा प्रवासी जखमी झाले आहेत.जखमींवर खामगावच्या सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुसरीकडे अपघात केल्यानंतर टिप्परचा चालक हा घटनास्थळावरून फरार झाला आहे.
खामगाव शेगाव महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे.दोन दिवसांपूर्वी उज्जैनकडे जाणारी लक्झरी बस उलटल्यानंतर आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास पुण्यावरून शेगाव कडे येणाऱ्या मनस्वी ट्रॅव्हल्सच्या खाजगी लक्झरी बसला रेतीच्या टिप्परने अमोरासमोर धडक दिली.या अपघातामध्ये लक्झरी बसच्या चालकासह सहा प्रवासी जखमी झाली आहेत.त्यामुळे त्यांना उपचारासाठी खामगाव सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. शेगाव रोडवर अपघातांचे वाढते प्रमाण चिंतेचा विषय बनला आहे.