गणेशपूर-मोहाडी रस्त्यावरील घटना

0
181
Google search engine
Google search engine

 

गणेशपूर-मोहाडी रस्त्यावरील घटना

: जनावर आडवे आल्याने अनियंत्रित कार पुलाच्या कठड्यावर आदळून झालेल्या अपघातात एका सहा वर्षीय बालकासह वृध्द महिला लजागीच ठार झाली. ही घटना खामगाव तालुक्यातील गणेशपूर -मोहाडी रस्त्यावर पहाटे घडली. तर तिघे गंभीर जखमी झाले असून दोन जखमींना पुढील उपचारार्थ अकोला येथे हलविण्यात आले आहे.
जळगाव जामोद तालुक्यातील गाडेगाव खुर्द येथील अवचार कुटुंबिय काही कामानिमित्त मंगळवारी पहाटे चिखलीकडे कारने जात होते. दरम्यान, मोहाडी-गणेशपूर रस्त्यावर त्यांच्या वाहनाच्या समोर जनावर आडवे आल्याने भरधाव कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या कठड्याला धडकली. या भीषण अपघातात सौ. नंदा विठ्ठल अवचार (६०), ऋषभ अंगत अवचार (०६) जागीच ठार झालेत. तर अंगत विठ्ठल अवचार (३५), माधुरी अंगत अवचार (३०), कु. परी अंगत अवचार (०२) गंभीर जखमी झाले. जखमींपैकी पती-पत्नी असलेल्या अवचार दाम्पंत्याला खामगांव खाजगी रुगणालयात हलविण्यात आले. तर दोन वर्षीय बालिकेवर खामगाव येथील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अंगत विठ्ठल अवचार हे चिखली येथील भारतीय स्टेट बँकेचे कर्मचारी असल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी हिवरखेड पोलीसात अपघातात नोंद करण्यात आली आहे.