*अमरावतीनजिक अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू*

0
18155
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. १६ : शहरातील रहाटगाव-बडनेरा नवीन बायपासवर हॉटेल गौरी इनपासून ५०० मीटर अंतरावर अज्ञात वाहनाच्या धडकेत नर बिबट्याचा रविवारी (१६ ऑक्टोबर) सकाळी ४ ते साडेचार दरम्यान मृत्यू झाला. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी पंचनामा, तसेच शव विच्छेदन करून, अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा हरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंदाजे चार ते पाच वर्षे वय असलेल्या नर बिबट्याचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. अज्ञात आरोपी विरुद्ध वन गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पशुवैद्यकीय विभागाचे सहाय्यक आयुक्त आर. डब्ल्यू. खेरडे यांच्या मार्गदर्शनात पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ए. जे. मोहोड व डॉ. एस. आर. ठोसर यांनी शवविच्छेदन केले.

सहाय्यक वनसंरक्षक ज्योती पवार, श्रीमती हरणे, क्षेत्र सहाय्यक एस. एम. देशमुख, वनरक्षक एस. डी. टिकले, पी. एस. खाडे, के. एन. इंगळे, ओंकार भुरे, राजू पिंजरकर, सी. बी. चोले, संदीप चौधरी, मानद वन्यजीव रक्षक डॉ. जयंत वडतकर आदी उपस्थित होते.शवविच्छेदनानंतर मृत बिबट्यास अग्नी देण्यात आला.

वनसंरक्षक जी के अनारसे, उपवनसंरक्षक चंद्रशेखर बाला यांच्या मार्गदर्शनात ही कार्यवाही करण्यात आली.