राज ठाकरेंचेआदेश,’शेगावला जा आणि राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला काळे झेंडे दाखवा’

1458

बुलडाणा
शेगाव
*भारत जोडो यात्रेला मनसे करणार विरोध …. राज ठाकरे यांच्या आदेशाचे तंतोतंत पालन करणार शेगावात मनसेसैनिक सज्ज*…

उद्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव मध्ये काँग्रेसची भारत जोडो यात्रा खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात येणार आहे. व त्यांची एक जाहीर सभा देखील होणार आहे. पण नुकतेच त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्याचे मोठे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत आहेत  आणि त्यातच नुकताच आता मनसे ने आपली यात एन्ट्री केल्याने व राज ठाकरे यांनी सर्व मनसैनिकांना शेगावात जमून राहुल गांधी यांच्या सभेला विरोध करत त्यांना काळे झेंडे दाखवावे असे फर्मान सोडल्याने सर्व मनसे सैनिक आता शेगावात येण्यात सज्ज असल्याचे शेगावातील मनसैनिकांनी सांगितले. तर एकंदरीत आता उद्या होणाऱ्या या भारत जोडो यात्रेचे आगमन व खासदार राहुल गांधी यांच्या सभेत करता एक वादाची किनार लागली आहे .आणि आता उद्याची सभा कशी होते व कशा पद्धतीने मनसैनिक त्यांचा विरोध करता हे बघावे लागेल.

जाहिरात
Previous article५८ हजार रूपये असलेली बॅग भरदिवसा दुचाकीच्या डिक्कीमधून लंपास , चांदूर स्टेट बँकेसमोरील घटना वृध्दाने बँकेतून काढले होते पैसे
Next articleलॉजमध्ये विवाहित प्रेमीयुगलाची गळफास लावून आत्महत्या युवकाने व्हीडीओ कॉल करुन भावाला दिली आत्महत्या करीत असल्याची माहिती