#लोकमत कॅम्पस क्लब आणि टीसीसी आयोजित – *बालदिनाच्या चित्रकला स्पर्धेत गौरी बेहेरे ला प्रथम पारितोषिक*

68

 

#या स्पर्धेत हजारो विद्यार्थी ने सहभाग घेतला


अमरावती: लोकमत कैंपस क्लब आणि तापड़िया सिटी सेंटर अमरावती आयोजित बाल दिवस चित्रकला स्पर्धा 2022 चा भव्य कार्यक्रम 20 नोव्हेंबर रोजी टी सी सी मॉल येथे पार पडला. या चित्रकला स्पर्धेत हजारो विद्यार्थी ने सहभाग घेतला होता. प्रत्येक स्पर्धेत नेहमी बाजी मारनारी अमरावती शहरातील नामवंत बालकलाकार साई नगर येथील रहिवासी १५ वर्षीय कु. गौरी भवनेश बेहेरे हिने पुन्हा एकदा सिद्ध केले की, मेहनत करून प्रयत्न करणारे कधीही पराभूत होऊ शकत नाही. गौरी बेहेरे ही स्कूल ऑफ स्कॉलर्सची दहावीची विद्यार्थिनी आहे. या चित्रकला स्पर्धेत गौरी बेहेरे हिने क गटात प्रथम क्रमांक पटकावला आहे. गौरी बेहेरे हीने मेक इन इंडिया या विषयावर अतिशय सुंदर रेखाचित्र काढले होते. ही रेखाचित्र आयोजक व परीक्षकांना खूप आवडले. स्पर्धेनंतर लगेच पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एकूण 20 विजेत्यांना पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. ही चित्रकला स्पर्धा तीन गटात घेण्यात आली. अ गटात इयत्ता 1 ते 4 मधील मुलांचा समावेश आहे. गट ब मध्ये 5 वी ते 8 वी पर्यंतच्या मुलांचा समावेश होता तर क गटात 9 वी ते 12 वी पर्यंतच्या मुलांचा समावेश होता. लोकमत कॅम्पस क्लब टीम आणि टीसीसी टीमच्या अपार मेहनतीमुळे ही भव्य चित्रकला स्पर्धा यशस्वीपणे पार पडली. सर्व मुलांच्या पालकांनी शांततेत सहकार्य करत या स्पर्धेचा लाभ घेतला.

जाहिरात
Previous articleजवळपास 2 तास विद्यार्थिनींनी रोखून धरल्या MSRTC च्या बसेस; वाहक चालकांवर रोष – गाड्या स्टॉपवर थांबवत नसल्याचा आरोप
Next articleअवघ्या दीड ते दोन लाख जनतेतच संपली काँग्रेसची विराट सभा….