अवघ्या दीड ते दोन लाख जनतेतच संपली काँग्रेसची विराट सभा….

272

शेगांव:- दिनांक 18 नोव्हेंबर २०२२ रोजी संत नगरी शेगाव ते झालेल्या भारत जोडो यात्रा आनंद सागर जवळील शेतामध्ये सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी माननीय राहुलजी गांधी यांची सभा जन समूहात संपन्न झाली. यादरम्यान सभास्थळी करोड रुपयाचे खर्च करण्यात आले भारत जोडो यात्रेचा अर्थ काय या विषयाची महीती माननीय खा.राहुलजीं गांधी यांनी आपल्या भाषणातून दिली त्यावेळी त्यांनी गजानन महाराज की जय असा जयघोष करीत आपल्या भाषणाला सुरुवात केली आणि शेतकरीच्या विषयावर बोलले व छत्रपती शिवाजी महाराज यांचे इतिहासावर प्रकाश टाकला.

मा.राहुलजींनी भारत जोडो या आता पर्यंतच्या यात्रेदरम्यान आपल्या हातामध्ये आपल्या पक्षाचा झेंडा घेतला नाही व कुठे तो लोकांना आढळला सुद्धा नाही या गोष्टीचे कौतुक सर्वत्र होत आहे व त्यांचा अभिमान सुद्धा वाटत आहे.
परंतु या सर्व गोष्टीवर पाणी फिरण्यासाठी त्यांचे कार्यकर्ते व नेते सक्षम आहेत कारण भारत जोडो यात्रेच्या नावा खाली काँग्रेस पक्षाचा झेंडा घेऊन सभा घेतात स्वागत करतात याची तीव्र नाराजी व रोष जनतेमध्ये दिसून आला की आपला नेता काय करतो आहे? कोणासाठी करतो ? कशासाठी करीत आहे? याचे कुठलेही भान न ठेवता आपली पोळी कशी शेकली जाईल यावर त्यांचे लक्ष होते. पण येणाऱ्या पुढच्या निवडणुकीत आपली सत्ता कशी येईल याकडेच फक्त पुढाऱ्यांचे लक्ष लागले आहे ?ही खेदजनक बाब आहे अशी लोकांची सभेमध्ये चर्चा सुरू होती.
सभे अगोदर काँग्रेस पक्षाकडून इतर पक्षांचे मोठे नेते येणार आहेत असे जनते मध्ये अफवा पसरवली गेली दरम्यान हे सिद्ध झाले की ती अफवा नसून सत्यच होते. की इतर कुठल्या ही पक्षाचा मोठा नेता सभेच्या वेळी स्टेजवर दिसून आला नाही म्हणजेच याचा अर्थ की सभे दरम्यानची जी भाषणे झाली काही आश्वासने देण्यात आली जे जनतेला पोट तिडकीने सांगण्यात आले मग ते खरे होते किती अफवा समजावी? जनता या संभ्रमात आहे की यावर कितपत विश्वास ठेवावा असो……हा सर्वात मोठा प्रश्न जनतेपुढे आहे.

काँग्रेस चा 5 लाखाची जनता असण्याचा दावा ठरला फोल.

सभेदरम्यान मुद्दामून तीन लाख
जनता आहे पाच लाख जनता आहे तसे पाहायला गेले तर अगोदरच्या दिवशी फक्त 48 हजार खुर्च्या लावण्यात आल्या होत्या ही एक बातमी लागल्यानंतर दखल घेण्यासाठी आणखीन 20000 खुर्च्या लावण्यात आल्या होत्या म्हणजे एकूण 70 ते 75000 खुर्चीस लावण्यात आली होती त्यामध्ये पांढरी, बदामी, लाल रंगाची ह्या तीन प्रकारच्या खुर्च्या लावण्यात आले होते हे काँग्रेस कार्यकर्त्यांना सुद्धा माहित नाही अरे ज्यांना सभा किती एकर मध्ये आहे याचा ठाव- ठिकाणा नाही त्यांना किती जनता आली आहे याचे कुठे भान राहील असावे विशेष म्हणजे यामध्ये व्हीआयपी वर्ग, काँग्रेस जोडो यात्रेचे आय कार्ड घातलेले वर्ग, हाच वर्ग सर्वात मोठ्या प्रमाणे हजर होता. त्यात पोलीस वर्ग व पत्रकार वर्ग हा सुद्धा होता परंतु ज्या लोकांसाठी ही सभा होती म्हणजेच शेतकरी, मंजूर वर्ग, व्यापारी, विद्यार्थी, बेरोजगार, गरजू अशा लोकांची संख्या मोजकीच होती मग या सभेमध्ये नेमके भाषण ऐकणारे जनता किती याचा अंदाज आता आपणच लावू शकता. म्हणून अनेक कार्यकर्त्यांची जनतेची नाराजी दिसली म्हणून भाषना अगोदरच घर वापशी होताना दिसली.

सांगताना असं सांगतात गजानन महाराजांच्या दर्शनाला आलेली भक्त सुद्धा आमचीच होती चला ठीक आहे तीही पकडू तरीसुद्धा पाच लाखाचा आकडा पूर्ण होत नाही आणि हो ज्या व्यक्तींना लोक ऐकण्यासाठी आले होते दूरवरून सकाळपासून तेथे हजर होती नेमकं त्याच व्यक्तीचे भाषण चालू असताना सभेतून लोकांनी पळ काढताना दिसले असे का? त्याचे कारण असे लोकांना काहीतरी नवीन ऐकायचं होतं आपल्या देशासाठी रोजगारासाठी काय नवीन संकल्पना आहे का? देशांना काही नवीन दिशा युवकांना पुढे जाण्याची ऊर्जा अशा अनेक बाबीवर भाषण हवे होते. पण सगळं ते जुन पुरान शेतकरी कर्ज बस.
अहो आपला देश तर तसा जुळलेलाच आहे आता हे काय जोडायला चालले तर स्वतःचा पक्ष
परंतु वीस मिनिटांच्या भाषणांमध्ये नाराजी शिवाय त्यांच्या पदरी काहीच पडले नाही मग एवढा मोठा खर्च कशासाठी कुणासाठी हा खर्च व्यर्थ शेवटी व्यर्थ ठरवा.

जाहिरात
Previous article#लोकमत कॅम्पस क्लब आणि टीसीसी आयोजित – *बालदिनाच्या चित्रकला स्पर्धेत गौरी बेहेरे ला प्रथम पारितोषिक*
Next articleप्रसिद्ध कथावाचक प्रदीप मिश्रा जी के मुखारविंद से #ताप्ती_शिव_महापुराण का बेतुल मे आयोजन – 12 से 18 दिसम्बर