काँग्रेस भारत जोडो यात्रेमुळे शेगांव नगर परिषद झाली माला माल

0
765
Google search engine
Google search engine

शेगांव :- काँग्रेस पक्षाची भारत जोडो यात्रा जनसमुहा मध्ये संपूर्ण भारतामध्ये सुरू आहे ती यात्रा महाराष्ट्र मध्ये भ्रमनकरीत विदर्भामध्ये दाखल झाली असता त्यामध्ये श्री क्षेत्र शेगांव येथे त्यांची जाहीर सभा ठेवण्यात आली होती या दरम्यान सभास्थळी महाराष्ट्रातील दिग्गज नेते सभेची पाहणी करण्याकरिता येणे जाणे सुरू होते त्याच दरम्यान शेगांवातील प्रत्येक ठिकाणी फलक, शुभेच्छा फलक लावण्यात आली होती जनु काही संपूर्ण शेगांव शहर हे बॅनरमय झालं होते.
सभा म्हटल्यावर नेते व कार्यकर्ते मोठ्या जोमाने कामाला लागले व सभेच्या दहा-बारा दिवसा अगोदरच बॅनर लावण्याची स्पर्धा सुरू झाली जसजशी सभेची तारीख जवळ येत होती तसतसी शहरातील बॅनर ची संख्या वाढायला सुरुवात झाली सभेच्या पहिल्या दिवशी तर पूर्ण शेगांव मध्ये बॅनरच बॅनर दिसत होते अशी कुठली जागा नव्हती असा कुठला पोल नव्हता किंवा असा कुठला रस्ता नव्हता म्हणजेच शहरातील प्रत्येक चौकात मग तो गांधी चौक असो छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बाळापूर रोड, खामगाव रोड उड्डाणपूल, गौलखेड रोड तसेच शहरातील असा कुठलाही कोपरा नव्हता की जिथे शुभेच्छुक फलक लावण्यात आलेले नव्हते. म्हणजे शेगांव नगर पालिकेची हद्द जिथपर्यंत आहे तिथपर्यंत हजारोच्या संख्येने फलक झडकत होती यामधुन नगरपरिषदला कोट्यावधीचा महसूल मिळाला असावा कारण की प्रत्येक बॅनरची परवानगी काढावी लागते व शेगांव नगरपरिषदचे संबंधित अधिकारी यांचा पारदर्शक कारभार पाहता त्यांची या सर्वांवर लक्ष होते. यावेळी शहरातील प्रत्येक ठिकाणचे अतिक्रमणे काढण्यात आली होती अशा जागेवर सुद्धा बॅनर लावण्यात आली होती. म्हणजेच नगरपरिषने ठरवून दिलेल्या जागे व्यतिरिक्त बॅनर लावण्यात आली होती. अर्थातच बॅनरची परवानगी व अवैध ठिकाणी बॅनर लावल्यामुळे त्याच्यावरील दंड असा सगळा महसूल शेगांव नगरपरिषदेने तिजोरी मध्ये जमा केला असावा असे म्हणणे वावगे ठरणार नाही. काहीही असो भारत जोडो यात्रेमुळे शेगांव नगरपरिषद खरच मलामाल झाली व मागील एका वर्षापासून फलाकाद्वारे किती महसूल गोळा झाला असावा काय ही माहिती शेगांव नगरपरिषदच्या मुख्याधिकारी देतील का असा महत्वाचा प्रश्न जनते पुढे आहे.

यासोबतच शेगांवातील महावितरण सुद्धा मागे राहिली नाही त्यांच्या सुद्धा इलेक्ट्रिक पोलवर बॅनर मोठ्या जोरात व बेधडक लावण्यात आले होते त्याचे कारण असे महावितरण अधिकारी मोहता साहेब व संबंधित सर्व अधिकारी यांनीही काही विशिष्ट सुविधा केली असावी की याच्यामुळे बॅनर लावणाऱ्या मुलांना कुठलाही प्रकारचा घातपात होणार कींवा कुठलीही ईजा होणार नाही याची दक्षता घेऊन बॅनर लावण्याची परवानगी दिली असावी? म्हणुन हे बॅनर आठ ते दहा दिवसापासून इलेक्ट्रिक लोखंडी पोलच्य दोन्ही बाजूंनी ने लावण्यात आले होती. यामुळे महावितरणला सुद्धा याचा काही लाभ झाला असावा अशी चर्चा जनता करताना दिसत आहे. असो आपल्याला काय घेणे महसूल गोळा झालाना हे महत्त्वाचे.