बेशिस्त अवैध अवास्तव दुकाने व वाहतूक कोंडीच्या निषेधार्थ व्यापारांची तक्रार

0
346

आठवडी बाजाराच्या दिवशी बेशिस्तअवैध अवास्तव दुकाने व वाहतूक कोंडी च्या निषेधार्त शेगाव शहर व्यापाऱ्यांची तक्रार

दि. 6 डिसेंबर रोजी स्थानीक किराणा व्यापारी व फेरीवाला यांच्या त झालेल्या सुनियोजित बाचाबाची चे रूपांतर मोठ्या घटनेत झाले व त्याला धार्मिक रंग देण्याचाही प्रयन्त झाला परंतु व्यापारी सामंजस्य यामुळे पुढील अनंर्थ टळला परंतु असे वाद हे दर आठवडी बाजाराच्या दिवशी होत असतात याच कारण म्हणजे त्याबाबत असलेली स्थानिक प्रशासनाची उदासीनता, वारंवार निवेदने,तक्रार देऊनही प्रशासन याबाबत कुठलीच पाऊले उचलत नाही, यामुळे स्थानिक व्यापारी व नागरिकांचे आर्थिक व मानसिक नुकसान होत. संतनगरी शेगाव ही संपूर्ण महाराष्ट्रात विदर्भ पंढरी म्हणून ओळखली जाते परंतु या सर्व प्रकारामुळे जर एखादी मोठी अप्रिय घटना घडली तर त्याला जबाबदार कोण? यांच्या निषेधार्त दिनांक 7 डिसेंबर रोजी स्थानिक तहसील कार्यालयात तहसीलदार महोदय यांच्या मार्फत मा. मुख्यमंत्री, गृहमंत्री, नगरविकास मंत्री , पोलीस आयुक्त , मुख्याधिकारी, यांना आठवडी बाजार साठी स्थाई जागा मिळणे बाबत, शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी, शहरातील व्यवसाय च्या नावाखाली सुरू असलेले वैश्या व्यवसाय, अवैध धंदे याला आळा घालण्या साठी, नगर पालिकेने आठवडी बाजारातील करोडो रुपये खर्च करून बाधेलेलं सिमेंट ओटे आता शोभेची वस्तू झाले आहे त्याच नियोजन साठी, मुख्य मार्ग व मंदिर परिसरात अतिक्रमण व वाहतूक कोंडी मुळे होणारे वाद व भक्त व नागरिकांची होणारी गैरसोय अश्या विविध मागण्या व समस्या यासाठी शहरातील शेगाव शहर व्यापारी परिषद अखिल भारतीय ग्राहक पंचायत, CPDA असोसिएशन, मेडिकल असोसिएशन, किराणा असोसिएशन, शेगाव संघर्ष समिती, नागरिक यांच्या वतीने तक्रार देण्यात आली. यावेळी शहरातील विविध व्यापारी संघटना, किराणा व्यापारी, मेडिकल , सामाजिक , राजकीय, संघटना, यांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वरील समस्यांचा संदर्भ पाहता काही प्रमाणात या समस्या शेगांव तहसीलदार साहेबच दुर करू शकतात परंतु काही करण्याची इच्छा शक्ती पाहिजे.कारण ही समस्यांवर या अगोदर सुद्धा वर्तमान पत्रात बातम्या लावण्यात आल्या पण काहीही परिणाम अधिकाऱ्यांवर दिसले नाहीत कारण अकार्यक्षम अधीकारी आणी त्यांचा प्रमुख तालुक्याचा राजा म्हणजेच तहसिलदार ति ऐक म्हण आहे ना :केल्याने होत आहे रे आधी केलिचे पाहीजे : काही करण्यासाठी क्षमता व इच्छाशक्ती पाहीजे. असं म्हणतात की आचरणात असलं काही करायचं असलं व ते सत्य असलं तर करायला काही वाव नही असेच एक आपले अधिकारी तुकाराम जी मुंडे आपल्या कामात तत्पर्य पारदक्षता असल्यामुळे त्यांची नेहमी बदली होत राहते व जनता त्याच्या पाठीशी उभा असते असे कार्यक्षम अधिकारी असणे गरजेचे आहे.
नाहीतर आम्ही दोन वाळूच्या टिप्परांवर गुन्हा दाखल करायचा गाड्या जप्त करायच्या आणि वर्षभर आपण समजू शकता….? त्याचबरोबर महसूल विभाग असो स्वस्त धान्याचा विभाग असो याकडेच आमचं लक्ष असते आणि शासनाने दिलेले काही मोहीम शासनाच्या नजरेत चांगले व्हावे यासाठीच पूर्ण करतात परंतु साध्या सोप्या समस्यांवर व जनतेच्या हितावर काम करण्याची इच्छा मुळीच होत नाही खरंच यावर जर तहसीलदार लक्ष दिले तर समस्या लवकर सुटेल परंतु…..