अमरावती ब्रेकिंग :- उद्या रविवारी बजरंग दल व विहिंपची  शौर्ययात्रा ; धर्मसभेला कालीपुत्र कालीचरण महाराज करणार संबोधित

0
2657

अमरावती /नांदगाव पेठ :-

बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या वतीने गीताजयंती निमित्त आयोजित शौर्य यात्रा व धर्मसभेला कालीपुत्र कालीचरण महाराज संबोधित करणार आहेत. उद्या दिनांक 25 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता स्थानिक राजपुत पुरा येथे या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विश्व महावीर ट्रस्टचे संस्थापक जैन मुनी नीलेशचंद्र महाराज यांची सुद्धा या निमित्ताने प्रमुख उपस्थिती असणार आहे.

मध्यप्रदेशातील भोजपूर येथे एका  मंदिरात शिवतांडव स्रोत गायनाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात असणारे कालीपुत्र कालीचरण महाराज यांची सध्या सर्वत्र चर्चा आहे.  बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आयोजित शौर्य यात्रा व धर्मसभेला आपले ज्वलंत व प्रखर विचार मांडण्यासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

25 डिसेंबर ला सायंकाळी 5 वाजता संत काशिनाथ महाराज यांच्या देवस्थानापासून शौर्य यात्रेला प्रारंभ होणार आहे