अमरावती ब्रेकिंग :- *जप्त रेती साठ्याच्या लिलावासाठी* *इच्छुकांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन* * *जाहीर लिलाव 6 जानेवारीला*

0
3637

*अमरावती, दि. 30 :* जप्त रेती साठ्याच्या लिलावासाठी इच्छुकांकडून उपविभागीय अधिकारी, अचलपूर यांच्या कार्यालयामार्फत प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. जप्त करण्यात आलेल्या साठ्याची किंमत अपसेट प्राईज प्रति ब्रास 600 रुपये असून एकूण अपसेट रक्कम 9 लक्ष 78 हजार घोषित करण्यात आली आहे. जप्त रेतीसाठ्याच्या घोषित हातच्या किमतीनुसार जाहीर लिलाव उपविभागीय अधिकारी अचलपूर यांच्या दालनात शुक्रवार, दि. 6 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता करण्यात येणार आहे.
मौजा भुगांव ता. अचलपूर जि. अमरावती येथील गट नं 334 येथील वासणी मध्यम प्रकल्पाचे बुडीत क्षेत्रातील पिली नदीच्या खोलीकरण व रुंदीकरणातून अंदाजे 1 हजार 630 ब्रास रेतीसाठा आढळून आल्यावरुन उपविभागीयस्तरीय व तालुकास्तरीय विशेष पथकामार्फत कार्यवाही करण्यात येवून या कार्यवाही दरम्यान सदरचा साठा जप्त करण्यात आला आहे.
जाहीर लिलावात सहभागी होणाऱ्या व्यक्ती, संस्था व शासकीय विभाग यांना लिलावात सहभागी होण्यासाठी अर्जासोबत ई-मेल आयडी, पॅनकार्ड, जीएसटी नंबर, करारपत्रक, रहिवासाचा पुरावा व आयकर भरणा करत असल्याचा पुरावा इत्यादी दस्ताऐवज सादर करावे लागतील. तसेच लिलावासाठी भरावयाची इसारा रक्कम व इतर सर्व रकमा धनादेशाव्दारे भराव्या लागतील. इसारा रक्कम वगळून अपसेट प्राईजच्या 25 टक्के रक्कम भरावी लागेल. लिलावात सर्वोच्च बोली ज्यांच्या नावे मंजूर होईल, त्यांना मंजूर रकमेवर शासन निर्णयानुसार आयकर 2 टक्के जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी (लिलाव रकमेच्या 10 टक्के) विहित मुद्रांक शुल्क भुपृष्ठ भाडे भरावे लागेल.
जाहिरनामा प्रसिध्द झाल्यानंतर दि. 6 जानेवारी रोजी प्रस्तावित लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी व्यक्ती, संस्था व शासकीय विभाग यांनी दि. 6 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजेपूर्वी शासकीय कार्यालयीन वेळेत उपविभागीय अधिकारी कार्यालय, अचलपूर येथे नाव नोंदविणे, धनादेश सादर करणे बंधनकारक राहील, असे अचलपूरचे उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी कळविले आहे.
*****

फोटो – फाईल