जय महाराष्ट्र शिक्षण संस्थेच्या वतीने श्री शिवप्रभु प्राथमिक विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.


जय महाराष्ट्र शिक्षण संस्था संचलित श्री शिवप्रभु प्राथमिक विद्यालय कडेगांव येथील पुर्व उच्च प्राथमिक इ. ५ वी शिष्यवृत्ती परिक्षा २०२२.परीक्षेमध्ये कु. राजनंदिनी माने जिल्ह्यात ५ वा क्रमांक व तालक्यात प्रथम क्रमांक पटकावला तर कु अनुष्का यादव द्वितीय,कु.वैष्णवी पवार तृतिय व कु. अवंतिका कोळी हीने सातवा क्रमांक पटकावला या सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलं त्याबद्दल सर्व गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार जय महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजाराम डांगे व सौ नंदादेवी राजाराम डांगे यांच्या शुभहस्ते करण्यात आला .खरी गुणवत्ता ही ग्रामीण भागातील मुलांमध्येच आहे . गेली वीस वर्ष श्री शिवप्रभु प्राथमिक विद्यालयाचे विद्यार्थी सातत्याने गुणवत्ता यादित चमकत आहेत. या यशात विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका यांचे अथक प्रयत्न व चिकाटी असल्यामुळे जिल्हास्तरावर विद्यार्थ्यांना यश मिळत आहे. असे प्रतिपादन सौ. स्वप्नाली अमोल डांगे यांनी व्यक्त केले.
प्रतिकूल परिस्थितीमध्येही सातत्याने श्री शिवप्रभु प्राथमिक विद्यालयाचे विद्यार्थी शिष्यवृत्ती परिक्षेत जिल्हा व तालुका स्तरावर चमकत आहेत. यश मिळवत हे कडेगाव तालुक्यासाठी एक अभिमानास्पद गोष्ट आहे . असे प्रतिपादन सौ.राजश्री अजित डांगे यांनी सत्काराच्या वेळी केले.

या सत्काराला कडेगाव नगरपंचायतीचे नगरसेवक आमोल डांगे,वसंत इनामदार,दिपक शेडगे,अजित डांगे हेमंत व्यास यांच्यासह शिक्षक,शिक्षिका,पालक व विद्यार्थ्यीउपस्थित होते.