ब्रेकिंग न्यूज :- अमरावती जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील चौघांची पुणे येथे आत्महत्या, पती-पत्नीसह दोन मुलांचा समावेश

0
6272

पुणे – पुण्यातील मुंढवा परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृतांमध्ये पती-पत्नी आणि दोन मुलांचा समावेश. या कुटुंबाने आर्थिक नुकसान झाल्यामुळे आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.

मिळालेल्या माहतीनुसार, दिपक थोटे ( वय- 59) इंदू दिपक थोटे ( वय- 45) मुलगा ऋषिकेश दिपक थोटे (वय- 24) मुलगी समीक्षा दिपक थोटे (वय-17) अशी आत्महत्या केलेल्या चौघांची नावे आहेत. मूळचे अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील असलेले थोटे कुटुंबीय दोन महिन्यापूर्वी ते केशवनगर भागात वास्तव्यास आले होते.