शे.का.प.माजी आमदार भाई संपतराव पवार पाटील व सामाजिक कार्यकर्त्या कॉम्रेड स्मिताताई पानसरे यांना क्रांतीवीर भगवानराव बाप्पा पाटील सामाजिक पुरस्कार जाहीर.

सांगली/ कडेगांव न्युज
सन २०२३ चा क्रांतिविर भाई भगवानराव पाटील ( बाप्पा ) सामाजिक पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्यातील शे.का.पक्षाचे माजी आमदार भाई संपतराव पवार पाटील यांना देणेत येणार. तसेच चालु वर्षी सुरु करणेत येणारा क्रांतिविरांगना हौसाताई पाटील पुरस्कार जेष्ट सामाजिक कार्यकर्त्या कॉम्रेड स्मिताताई पानसरे याना देणेत येणार. असि माहीती अॕड . सुभाष पाटील यानी दिली.
क्रांतिविर भगवानराव पाटील ( बप्पा ) जन्म शताब्दी समिती हणमंतवडीये आणि खानापूर /कडेगाव साहीत्य प्रेमी यांच्या वतीने २००६ पासून जेष्ट स्वातंत्र्य सेनानी माजी आमदार क्रांतिविर भाई भगवानराव पाटील ( बाप्पा ) यांच्या नावाने सामाजिक पुरस्कार देत आहेत. बप्पांचे विचाराने व त्यांनी चालवलेल्या वाटेवरुन चालणाऱ्या सामाजिक जिवनात कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांना हा पुरस्कार देण्यात येतो. चालु वर्षी हा पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्यातील सांगरुळ मतदार संघाचे माजी आमदार , शेतकरी कामगार पक्षाचे जेष्टनेते भाई संपतराव पवार पाटील बापू याना देण्याचे निश्चित केले आहे. भाई संपतराव पवार यांचे गेल्या ६० वर्षातील सामाजिक / राजकीय काम कोल्हापूर जि.प. सदस्य ते सांगरुळचे लोकप्रिय आमदार हा प्रवास ,सहकाचळवळीतील , शैक्षणिक चळवळीतील योगदा , राजकीय पक्ष निष्टा आयुष्यभर एक पक्ष ,एक झेंडा हे सर्व लक्षात घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेणेत आला आहे.
पुरस्काराचे स्वरूप मानपत्र , सन्मानचिन्ह , महावस्त्र , श्रीफल ,रोख रु. ११०००/- असे आहे. आता पर्यंत हा पुरस्कार प्राचार्य विश्वास सायनाकर , अॕड . दत्ताजीराव माने , स्वातंत्र्य सेनानी कॕप्टन रामभाऊ लाड , प्रा. डाॕ. बाबुराव गुरव , प्रा. डॉ. जयसिंगराव पवार ,मा.आमदार शरद पाटील , डॉ शैलाताई दाभोळकर , कॉ. प्रा. प्रतिमा परदेशि , प्रा. डॉ. श्रीमंत कोकाटे , मा. आम. भाई विवेक पाटील , कॉ दत्ता देसाई , कॉ. धनाजी गुरव , मा. मधुसुधन मोहीते .ईत्यादींना देणेत आला आहे.
गतवर्षी दिवंगत झालेल्या क्रांतिविरांगना हौसाताई पाटील यांचे नावानेही त्या चाललेल्या वाटेवरु वसमतेच्या ध्येयाने कार्यरत आसलेल्या महीला कार्यकर्तीस त्यांचे नावाचा क्रांतिविरांगना हौसाताई पाटील सामाजिक पुरस्कार देणेचे ठरवले आहे. हा पुरस्कार कॉम्रेड स्मिताताई पानसरे यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थी दशेपासू ते आज अखेर गेली ४० वर्षे साम्यवादी विचारावरुन वाटचाल करत आसलेल्या, लढाऊ पिता कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांचेकडून लढण्याचे बाळकडू घेऊन तोच वारसा निर्भयपणे पुढेचालवणऱ्या लढाऊ कार्यकर्त्या कॉग्रेड. स्मिताताई पानसरे यांची ओळख अवघ्या महाराष्ट्राला आहे. याचसाठी त्यांची निवड क्रांतिविरांगना हौसाताई पाटील सामाजिक पुरस्कार यासाठी केली. आहे.
या पुरस्काराचे स्वरुप मानपत्र , सन्मानचिन्ह , श्रीफल , आणि रोख रक्कम रु. ११०००/- असे आहे.
हे पुरस्कार भारती विद्यापिठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम यांचे शुभहस्ते हणमंतवडीये येथे दि. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी १-३० वाजता आयोजित करण्यात आला असल्याचे ॲड.सुभाष पाटील यांनी सांगीतले.
दि. ३/१/२०२३ रोजी हणमंतवडीये येथे श्री आनंदराव पाटील सर यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आला. या वेळी अॕड . सुभाष पाटील , श्री रघुराज मेटकरी, प्रा. विश्वनाथ गायकवाड , जनाब मुजावर , श्री सदांनंद माळी , श्री रणजित पाटील , श्री इंद्रजित पाटील इत्यादी मान्यवर या बैठकिस उपस्थीत होते.

जाहिरात
Previous articleब्रेकिंग न्यूज :- अमरावती जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील चौघांची पुणे येथे आत्महत्या, पती-पत्नीसह दोन मुलांचा समावेश
Next articleअमरावती में शुरू हुई Reliance Jio की 5G सर्विस, मिलेगी 1Gbps तक की स्पीड