संतनगरीचे रोहित देशमुख विद्यापीठाच्या शैक्षणिक समितीवर
शेगांव :- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव माध्यमशास्त्र प्रशाळेच्या शैक्षणिक समितीवर संतनगरी शेगांवतील पत्रकार रोहित देशमुख यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या विद्यापरिषदेच्या झालेल्या सभेत विद्यापीठ परिसरातील प्रशाळेसाठी स्वायत्तता प्रदान करण्यात आली. यासंदर्भात विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीच्या ठरावाने माध्यमशास्त्र प्रशाळेकरीता शैक्षणिक समिती गठित करण्यास विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. महेश्वरी यांनी मान्यता दिली आणि माध्यमशास्त्र प्रशाळा संचालक डॉ. भटकर यांनी नामनिर्देशनाने समितीवर दोन शैक्षणिक सत्रासाठी रोहित देशमुख यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली.
समितीवर नियुक्तीने त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचा आणि अनुभवाचा प्रशाळेच्या उज्ज्वल भवितव्यासाठी उपयोग होईल असा विश्वास संचालकांनी व्यक्त केला आहे.