डॉ. हरिदास आखरे ३१ जानेवारीला अमरावती आकाशवाणीवर

0
211
Google search engine
Google search engine

डॉ. हरिदास आखरे यांची
३१ जानेवारीला अमरावती मधील “नमस्कार अमरावती” आकाशवाणीवर मुलाखत

शेगाव:- संत नगरी शेगाव येथील संतसाहित्य व शिवचरित्राचे अभ्यासक तथा श्रीमती कोकिळाबाई गावंडे महिला महाविद्यालय दर्यापूर येथील मराठी विभागाचे सहाय्यक प्रा. डॉ. हरिदास आखरे दिनांक ३१ जानेवारी २०२३ ला अमरावती आकाशवाणीवर (101.5 MHZ) आपली प्रगट मुलाखत देतील. सकाळी १०.३० वाजता
नमस्कार अमरावती या कार्यक्रमात त्यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.
महाराष्ट्रातील संत व प्रबोधन परंपरा,
त्यांचा एकूण लेखन प्रवास याबद्दलचे चिंतन यातून ते मांडतील. सोबतच वाचन संस्कृती जोपासण्याचा त्यांचा संदेश व वाचनातून होणारी मनाची तथा समाजाची मशागत याबद्दलचा उहापोह यातून ते करणार आहेत. सदर मुलाखतीसाठी त्यांना अमरावती आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी विनोद गवळी संजय ठाकरे, नितीनजी दातिर साहेब, अजय घरडे, इंगोले मॅडम, तंत्रज्ञ युवराज घटारे, सुनील वानखडे यांचे सहकार्य लाभले. सर्व श्रोत्यांनी या मुलाखतीचा अवश्य लाभ घ्यावा असे त्यांनी कळवले आहे.