कडेगांव तालुक्यात गुणवत्तेचा ठसा जय महाराष्ट्र शिक्षण संस्थेच्या श्री शिवप्रभु प्राथमिक शाळेने उमटविला. न्यायाधीश प्राजक्ता सबनिस.

0
603
Google search engine
Google search engine

कडेगांव/ सांगली

कडेगावसह परीसरात गुणवतेचा ठसा शिवप्रभू प्राथमिक विद्यालयाने उमटवत नावलौकिक मिळवला आहे या ज्ञानमंदीरातून समर्थपणे भावी नागरिक तयार होतील असे मत न्यायाधिश प्राजक्ता सबनीस यांनी व्यक्त केले कडेगाव येथील शिवप्रभू विद्यालयाच्या रौप्यमहोत्सव वर्षानिमित्त पारितोषिके वितरण सभारंभात अध्यक्षपदावरुन बोलत होत्या याप्रसंगी तहसिलदार डाँ सौ शैलजा पाटील, दिवाणी न्यायाधिश चं रा पाटील, विस्तार अधिकारी मधुकर जंगम, ज्ञानेश्वर चिमटे,कर्नल संग्राम यादव अँड शुंभागी काळे ,संस्थापक राजाराम डांगे आदी मान्यवर उपस्तित होते
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मनिषा पवार यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबदल, शहिद जवानाच्या वीरपत्नीचा व आजी माजी सैनिकाचा सत्कार व ५वीत स्कालरशिप परीक्षेत गुणवता यादीत आलेल्या विध्यार्थ्यांचा सत्कारविविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला तर संस्थेला २५वर्ष पुर्ण झाल्याबदल संस्थापक राजाराम डांगे याचा सत्कार विद्यालयाच्या सेवकांनी मान्यवरांच्या हस्ते केला
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक प्रविण कदम सूंत्रसंचलन प्रा. सुर्यकांत बुरुंग तर आभार सौ सुनिता शिंदेनी मानले.