विद्यापीठ अभ्यास मंडळावर डाॅ.सौ.मंदा मोहिते-घाटगे यांची निवड.*

0
171

*सांगली/कडेगांव न्युज:
*कडेगाव येथील मातोश्री बयाबाई श्रीपती कदम कन्या महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाच्या प्रमुख प्राध्यापक डाॅ.सौ.मंदा मोहिते-घाटगे यांची शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळावर कुलगुरु नामनिर्देशित सदस्य म्हणून नुकतीच निवड झाली.त्याचे पत्र महाविद्यालयास प्राप्त झाले.त्यामुळे प्राचार्य डाॅ.कदम व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी डाॅ.सौ.मंदा मोहिते-घाटगे यांचे अभिनंदन केले.*
*यावेळी डाॅ.मोहिते-घाटगे म्हणाल्या की “आजपर्यंत प्रामाणिकपणे केलेल्या कामाची पोच पावती मिळाली आहे सदस्य म्हणुन नवीन शैक्षणिक धोरणानुसार जे अभ्यासक्रम तयार केले जातील त्यात प्रामुख्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वैशिष्टय़पूर्ण अभ्यासक्रम तयार करण्याचा मानस असेल.”*
*यावेळी भारती विद्यापीठाचे कुलगुरु डाॅ.शिवाजीराव कदम सर तसेच आमदार डाॅ.विश्वजीत कदम यांनी अभिनंदन केले.*