कडेगाव तहसिल,भूमी अभिलेख कार्यालयातील लूट थांबवी अन्यथा तहसिल कार्यालयावरून उडी मारून आंदोलन करण्याचा डी एस देशमुख यांचा सणसणीत इशारा.

0
609
Google search engine
Google search engine


सांगली/कडेगांव न्युज.

कडेगाव तहसील कार्यालय, भूमीअभिलेख व दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये शेतकरी व नागरिक यांची आर्थिक लुट सुरु आहे.ती तात्काळ थांबवावी अन्यथा आमरण उपोषण व तहसिल कार्यालयावरुन उडी मारून आंदोलन केले जाईल. असे सणसणीत इशाराचे निवेदन राष्ट्रवादीचे पलूस-कडेगाव विधानसभा क्षेत्र अध्यक्ष डी.एस.देशमुख यांनी प्रांताधिकारी यांना दिले.
येरळा नदीतील वाळूची होत असलेली तस्करी त्वरित बंद करावी.भूमी अभिलेख कार्यालयात शेतकऱ्यांनी गेली पाच ते सहा वर्षे मोजणीसाठी तीन ते चार वेळा पैसे भरूनही मोजण्या झालेल्या नाहीत.भूमी अभिलेख कार्यालयातील मधील काही कर्मचारी हे कार्यालयीन वेळेत कामकाज न करता सायंकाळी 7 ते रात्री 12 पर्यंत कामकाज करीत आहेत.त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून येथे आर्थिक देवाण घेवाण करणाऱ्या दलालांची कायम उठ बस आहे.तर दुय्यम निबंधक कार्यालयातील बरीच कामे दलालाशिवाय होत नाहीत.सर्व सामान्य नागरिकांना स्टॅम्प पेपर व तिकिटे मिळत नाहीत व मिळाली तर ज्यादा पैसे घेऊन दिली जातात.तहसील कार्यालायातील सीसीटीव्ही बंद आहेत.त्यामुळे वाळू तस्करीत पकडलेली वाहने चोरीस जात आहेत आदी प्रमुख मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
याबाबत महसूल विभागाकडून 14 मार्च 2023 पर्यंत दखल घेतली नाही तर 15 मार्चपासून आमरण उपोषण व तरीही काही कारवाई न झाल्यास 18 मार्च 2023 नंतर तहसील कार्यालयावरुन उडी मारून आंदोलन केले जाणार आहे असे निवेदनात नमुद केले आहे.
यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रवीण करडे,जीवन करकटे,नवनाथ काकडे,बबन पवार आदी उपस्थित होते.