शेगांव:- दिनांक 9मार्च ला सकाळी च 10 वाजता एक आजी बाई ने रडत च एका आरपीएफ स्टाफ चा हात पकडला आणि सांगितले की माझ्यासोबत चे सगळे ट्रेन मधे गेले अन मि गर्दीत इथेच राहिली, ज्याचा हात पकडला ते शेगाव आरपीएफ विभागाचे चर्चित प्रधान आरक्षक रंजन तेलंग यांचा ,
रंजन तेलंग यांनी आजीबाई ला नाश्ता दिला आणि प्रेमाने विचारपूस करत विचारले तर सत्य परिस्थिती समजली, रंजन तेलंग यांनी आजी बाई ला आपल्याच ठाण्यात बसवून ठेवले व दुपारी 4 ला ओखा पुरी एक्सप्रेस मध्ये जाणाऱ्या 5 महिलांना माहिती देऊन त्यांना सोबत नेण्यास सांगितले वर्दीतला माणूस मदत मागतोय म्हणून ते ही तैयार झाले ,रंजन तेलंग यांनी आजीला बसवून देऊन आरपीएफ च्या चंद्रपूर च्या निरीक्षक राय साहेबांना कॉल वर माहिती देऊन मदत मागितली यांनी ही मदत देऊन शेवटी प्रधान आरक्षक शशिकांत थोरात यांना आजीला डायरेक्ट घरी पोहचवून देण्याचे आदेश दिले आणि शेवटी आजीबाई चंद्रपूर ला घरी पोहचल्या
आज आरपीएफ चे प्रधान आरक्षक रंजन तेलंग, निरीक्षक चंद्रपूर श्री राय , प्रधान आरक्षक शशिकांत थोरात यांनी सर्वांनी आपापली जबाबदारी समजून जे कार्य केले त्या कार्याला खरोखर सॅल्युट जयहिंद