शेगाव ला जाणाऱ्या भाविकांचा समद्धी महामार्गावर भीषण अपघात, सहा जण ठार तर सात जखमी

0
9007
Google search engine
Google search engine

 

मेहकर :-  समृद्धी महामार्गावर भरधाव इर्टीगा कार उलटल्याने सहा जण ठार तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज मेहकर-सिंदखेड राजा दरम्यान लोणार तालुक्यातील शिवणी पिसा जवळ  सकाळी ८ वाजता घडली. यात चार जणांचा जागीच तर दाेन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मृतांमध्ये हाैसाबाई भरत बर्वे (वय ६५), श्रद्धा सुरेश बर्वे (वय २८), किरण राजेंद्र बाेरुडे (वय २८), प्रमिला राजेंद्र बाेरुडे (वय ५२), भाग्यश्री किरण बाेरुडे (वय २५), जान्हवी सुरेश बर्वे (वय ११) सर्व रा़ एन ११ हुडकाे, छत्रपती संभाजीनगर यांचा समावेश आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील बाेरुडे आणि बर्वे कुटुंब शेगाव येथे अर्टिगा कारने रविवारी सकाळी जात हाेते़ दरम्यान, मेहकर-सिंदखेड राजा दरम्यान लोणार तालुक्यातील शिवणी पिसा जवळ असलेल्या पुलाजवळील खचक्यामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले़ त्यामुळे कार रस्त्याच्या मधाेमध असलेल्या मिडीयमध्ये शिरल्याने उलटली. तीन ते चार वेळा उलटल्याने कार रस्त्याच्या दुसऱ्या बाजुला फेकली गेली़.

जखमींमध्ये कार चालक सूरेश भरत बर्वे (वय ३५) , नम्रता रविंद्र बर्वे (वय ३२),इंद्र रविंद्र बर्वे (वय १२), साैम्य रविंद्र बर्वे (वय ४ वर्ष), जतीन सुरेश बर्वे (वय ४ वर्ष), वैष्णवी सुनील गायकवाड (वय १९ वर्ष), यश रविंद्र बर्वे (वय १०) आदींचा समावेश आहे़.