एफ. एम. काशेलानी स्कूलचा स्तुत्य असा परिपाठ…

585

*एफ एम काशेलानी स्कूलचा स्तुत्य असा परिपाठ…*

शेगांव:- स्थानिक एफ. एम. काशेलानी इंग्लिश मीडीयम स्कूलमध्ये विद्यार्थांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी व त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी आपण शालेय दैनंदिन परिपाठ घेतो . जशी एक मोत्याची माळ असते त्यातील मोती एकक्रमाने आपले विद्यार्थी परिपाठ स्वतः घेतात . मोती म्हणजे यामध्ये सुविचार, चालू घडामोडी , राष्ट्रीय गीते , वॉर्म अप, प्रतिज्ञा , भारताचे संविधान , राष्ट्रगीत , ह्या सर्व माळेतील मोत्यांना घेऊन एक सुंदर असा परिपाठ रोज घेतल्या जातो , यामुळे त्यांचा आत्मविश्वास , उत्साह , कल्पनाशक्ती , विचारशक्ती आणि शारीरिक व मानसिक विकास होतो.
सदर परिपाठामध्ये जिल्हा परिषद शाळांच्या धर्तीवर विविध दिवशी विविध राष्ट्रीय गीते घेतल्या जातात. विद्यार्थ्यांना तीनही भाषेतून आळीपाळीने प्रतिज्ञा आणि संविधानाचे प्रास्ताविक शिकवल्या जाते. दररोज विद्यार्थ्यांची सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नमंजुषा घेतली जाते ज्याचा विषय अगोदरच्या दिवशीच सांगण्यात येतो जेणेकरून या उपक्रमाची परिणामकारिता अधिक होईल. सोबतच राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींबाबत प्रत्येकी एक बातमी विद्यार्थ्यांना सांगितली जाते. जगातील आश्चर्यकारक अशा ५ गोष्टी विविध क्षेत्राबद्दल दररोज सांगितल्या जातात. शाळेतील प्रत्येक मुलाचा सभाधिटपणा वाढावा यासाठी प्रत्येक वर्गाच्या प्रत्येक विद्यार्थ्याला किमान स्टेजवर येऊन बोलण्याची संधी दिली जाते. मुख्याधापक तथा संचालक श्री कुणाल काशेलानी यांच्या मार्गदर्शनात सहसंचालक शुभम देशमुख यांनी या परिपाठाची रचना केली. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सदर परिपाठासाठी परिश्रम घेतात आणि विद्यार्थ्यांना अधिक उज्ज्वल भविष्य देण्यासाठी प्रयत्न करतात.

जाहिरात
Previous articleब्रेकिंग :- महिलांना आजपासून एसटी बसेस च्या तिकीट मध्ये 50 % सवलत लागू…पहा परिपत्रक
Next articleएच३ एन२’चा पहिला रूग्ण आढळला;प्रकृती स्थिर *घाबरून जाण्याचे कारण नाही, जागरूक राहावे* – *जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिलीप सौंदाळे*