नेहरू युवा केंद्राच्या उत्कृष्ट युवा स्वयंसेवक पुरस्काराने सुरज बोरसे सन्मानित

0
155

नेहरू युवा केंद्राच्या उत्कृष्ट युवा स्वयंसेवक पुरस्काराने सुरज बोरसे सन्मानित

शेगाव : नेहरू युवा केंद्राच्या वतीने शेगांव तालुक्यातील राष्ट्रीय युवा स्वयंसेवक सुरज बोरसे यांना जिल्हास्तरीय उत्कृष्ट युवा स्वयंसेवक पुरस्काराने बुलढाणा येथे २५ मार्च रोजी बुलढाणा अर्बनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक उर्फ भाईजी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे.
युवा कार्यक्रम खेल मंत्रालय भारत सरकार अंतर्गत असलेले नेहरू युवा केंद्र बुलढाणा जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामधून दोन राष्ट्रीय युवा स्वयंसेवक म्हणून काम करत असतात यामध्ये जिल्ह्यातून उत्कृष्ट काम करणारे स्वयंसेवकांना उत्कृष्ट युवा स्वयंसेवक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते यामध्ये शेगांव तालुक्यातील सुरज मार्तंडराव बोरसे यांना जिल्हास्तरीय सन २०२१-२२ चा उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार प्रदान करण्यात आला. सहकार ऑडीटोरिअम , सहकार विद्यामंदिर बुलढाणा येथे जिल्हास्तरीय युवा संसद कार्यक्रमामध्ये खासदार प्रतापराव जाधव, बुलढाणा अर्बन अध्यक्ष राधेश्याम चांडक, महाराष्ट्र विधानसभा माजी सभापती अरुणलाल गुजराथी, नेहरू युवा केंद्र जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर, कार्यक्रम पर्यवेक्षक अजयसिंग राजपूत यांच्या हस्ते शेगांव तालुका स्वयंसेवक सुरज बोरसे यांना सन्मानित करण्यात आले. २०२१- २२ मध्ये शेगांव तालुक्यात मतदार जनजागृती, पाणी अडवा पाणी जिरवा जनजागृती, भाषण स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा अशा विविध प्रकारच्या स्पर्धा, क्रिडा स्पर्धा, करिअर मार्गदर्शन मेळावा, महिला सक्षमीकरण कार्यशाळा, स्वच्छता अभियान, महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी साजरी करणे, गावा गावात युवा मंडळ स्थापन केले. तालुक्यामध्ये स्वच्छ भारत अभियान राबविण्यात आले. महिलांना शिवण कर्तण प्रशिक्षण देणे, जागतिक महिला दिन साजरा करणे, युवक युवतींना व्यासपीठ निर्माण करण्यासाठी सदैव तत्पर असणे अशा कामाची दखल घेत सुरज बोरसे यांना उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले मागील वर्षी सुद्धा स्वच्छ भारत अभियान तालुक्यामध्ये राबविल्यामुळे तत्कालिन जिल्हाधिकारी एस रामामुर्ती यांच्या हस्ते सुरज बोरसे यांना सन्मानित करण्यात आले होते